कोल्हापुरात आपुलकीचा फराळ !
schedule23 Oct 25 person by visibility 27 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दिवाळी म्हटलं की फटाक्यांची आतषबाजी, खमंग फराळांचा आस्वाद हे सारं काही ठरलेलं. नातेवाईक आणि मित्र मंडळीसोबत फराळावर तावर मारण्यातील आनंद काही औरच. या साऱ्या धामधुमीत कोल्हापुरात गुरुवारी (२३ ऑक्टोबर २०२५) ‘आपुलकीचा फराळ’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्वधर्मीय सहभागी झाल्यामुळे त्याची लज्जत आणखी वाढली. लोकराजा राजर्षी शाहू महाराज लोकोत्सव समितीच्यावतीने कोल्हापुरातील सामाजिक ऐक्याची भावना टिकावी या उदात्त हेतूने कोल्हापुरातील सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी आयोजित ‘आपुलकीचा फराळा’ हा कार्यक्रम झाला. ऐतिहासिक बिंदू चौक येथे हा कार्यक्रम झाला. खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांची विशेष उपस्थिती होती. र ाज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनीही कार्यक्रमस्थळी भेट देऊन दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के. पोवार, कॉम्रेड चंद्रकांत यादव, अर्बन बँकेचे संचालक संभाजीराव जगदाळे, माजी नगरसेवक ईश्वर परमार, बाळासाहेब मुधोळकर, अॅड. तौफिक मुलांनी, रियाज सुभेदार, रमेश मोरे, प्रताप नाईक, कादर मलबारी, अमर समर्थ, रहीम बागवान, डी.जी. भास्कर, हाजी अस्लम, हिदायत मणेर, दुर्वास कदम, प्रवीण सोनवणे, पै. बाबा महाडिक, शौकत बागवान उपस्थित होते.