Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळतर्फे  स्मार्ट वजन काटे-साहित्याचे वाटपराजकारण्यांना सत्ता-फायद्याच्या विषयात इंटरेस्ट, हद्दवाढीचे देणेघेणे नाही –कृती समितीचा आरोपबिल्डर लॉबीसाठी हद्दवाढीचा उद्योग - विरोधी कृती समितीचा आरोपयंदा अकरावीचे प्रवेश ऑनलाइन प्रक्रियेद्वारेच ! विद्यार्थ्यांनी ऑफलाइन प्रवेश घेऊ नये !!पोलिसांच्या वागणुकीचा फटका आमदारांना, शेतकऱ्यांची अडवणूक ! संघर्ष समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणीजिल्ह्यातील पन्नास हजार घरकुलांचे काम २६ जानेवारीपर्यत पूर्ण होणार-पालकमंत्री प्रकाश आबिटकरपुण्यातून आमदार-सांगलीचा पालकमंत्री असलो तरी कोल्हापूरच्या विकासाला फर्स्ट प्राधान्य –मंत्री चंद्रकांत पाटीलआनंदयात्री फेसबुक समूहातर्फे मंगळवार एकांकिका सादरीकरणधनंजय महाडिकांकडून कबड्डीपटूंना बक्षीसाचे बोनस ! बारा खेळाडूंना प्रत्येकी दहा हजार प्रदान !!वारणा महाविद्यालयात कॅन्सर संशोधनाला आंतरराष्ट्रीय पेटंट

जाहिरात

 

उद्योजकांच्या हस्ते बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन

schedule18 May 25 person by visibility 52 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने व लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने  विझार्ड चेस क्लबने आयोजित केलेल्या नऊ वर्षाखालील मुला-मुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेस उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेत कोल्हापूर, इचलकरंजी, वारणानगर, जयसिंगपूर, गडहिंग्लज व गारगोटी येथील नामांकित ५५ बुद्धिबळपटू सहभागी आहेत.

 स्पर्धेचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष व उद्योगपती अरुण गोयंका व युवा उद्योजक मनीष झंवर यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, मनिष मारुलकर,अनिश गांधी, आरती मोदी, ऋतुराज भोकरे व सुशांत कांबळे  उपस्थित होते.
  रविवारी झालेल्या तिसऱ्या फेरीनंतर मुलांच्या गटात अद्वैत कुलकर्णी कोल्हापूर, युवेन भिडे इचलकरंजी, आरुष  पाटील गडहिंग्लज व अर्णव वरुटे इचलकरंजी हे चौघेजण तीन गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. अवनीश बडवे इचलकरंजी, सुदर्शन पाटील इचलकरंजी व ऋतुराज पाटील इचलकरंजी हे तिघेजण अडीच गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.
 मुलींच्या गटात इचलकरंजीची सांची बजाज व कोल्हापूरची तनिषा चौगुले या दोघीजणी तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. कृष्णा पाटील कोल्हापूर, चार्मी शहा इचलकरंजी, मनस्वी शिरगुरे नांदणी, शनया मालानी इचलकरंजी, भक्ती कोळी जयसिंगपूर व परिणीता हंडल कोल्हापूर या सहा जणी दोन गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes