उद्यम सोसायटीत सत्तारुढ पॅनेलचे अकरा उमेदवार विजयी, परिवर्तन पॅनेलला दोन जागा
schedule21 Apr 25 person by visibility 124 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर उद्यम को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजर्षी शाहू जुने सत्तारुढ पॅनेलने अकरा जागा जिंकत वर्चस्व कायम राखले. विरोधी, राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलला दोन जागा मिळाल्या. दहा वर्षानंतर उद्यम सोसायटीची निवडणूक झाली. सत्तारुढ आघाडीचे नेतृत्व माजी आमदार व सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले.
उद्यम सोसायटीसाठी रविवारी (२० एप्रिल २०२५) निवडणूक झाली. तेरा जागेसाठी ३४ उमेदवार रिंगणात होते. दरम्यान अनुसूचित जाती – जमाती गटातून राजन सातपुते, सोसायटी मतदारसंघ गटातून अतुल आरवाडे यांचा एकेक अर्ज होता. यामुळे संबंधित गटात सत्तारुढ पॅनेलमधील या दोघांची निवडणूक बिनविरोध झाली होती.
सोसायटीचे एकूण मतदार ५६९ आहेत. त्यापैकी ४२० इतके मतदान झाले. ४०८ मते वैध त १२ मते अवैध ठरली. सायंकाळी सहा वाजता निकाल जाहीर झाला. यामध्ये सत्तारुढ पॅनेलमधील कारखानदार गटातून संजय अंगडी २४३ मते,हिंदुराव कामते २३६, चंद्रकांत चोरगे २४०, अशोक जाधव २२०, संजय थोरवत २२२, आनंद पेंडसे हे २२७ मते घेत विजयी झाली. जयश्री जाधव या महिला राखीव गटात सर्वाधिक २६९ इतक्या मतांनी विजयी झाल्या. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटात सुधाकर सुतार २३१, विमुक्त जाती-भटक्या जमाती गटात अविनाश कांबळे (२२० मते) विजयी झाले.
परिवर्तन पॅनेलमधून महिला राखीव गटातून संगीता नलवडे या २३४ मते घेत विजयी झाल्या. तर कारखानदार गटातून अमर कारंडे (२१० मते ) विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. पी. खामकर यांनी काम पाहिले. संदीप पाटील, हरी खोत, मिलिंद पाटील यांनी सहकार्य केले.