बोलवाड शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतकडून दसरा भेट
schedule12 Oct 24 person by visibility 113 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषद शाळा बोलवाडमधील सहा मुलं व सहा मुली यांना ग्रामपंचायत बोलवाड सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून लांबून चालत येणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले.
सरपंच निगार शेख, उपसरपंच सचिन दादा कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य भाऊसो नरगचे, शोएब बारगीर, पुष्पावती पाटील ,वंदना खोत, मुख्याध्यापक अमोल माने यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आल्या. लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेल्या सायकली या एक प्रकारे दसरा भेट असल्याचे मुख्याध्यापक अमोल माने यांनी सांगितले .
जिल्हा परिषद शाळा बोलवाड हे दुसऱ्या टप्प्यातील मॉडेल स्कूल असून एमपीएसपी कडून नुकतेच संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करून मिळाले आहे.शाळेच्या जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी ग्रामपंचायत कडून लवकरच पैसे भरण्यात येतील व येणाऱ्या दिवसांमध्ये जुनी इमारत पाडून नवीन सुसज्ज इमारत बांधून मिळण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर प्रयत्न करू असा विश्वास सरपंच निगार शेख व उपसरपंच सचिन कांबळे यांनी उपस्थितांना दिला. जिल्हा परिषद शाळा बोलवाड मध्ये लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील असेही उपसरपंच सचिन कांबळे यांनी सांगितले.
पंधराव्या वित्त आयोगातून बोलवाड गावातील तीनही अंगणवाड्यांना ग्रामपंचायत मार्फत गॅस कनेक्शन त्यामध्ये एक शेगडी व दोन सिलेंडर टाकी तसेच विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार शिजवण्यासाठी भांडी व मिक्सर देण्यात आला. यावेळी सदस्य भाऊसो नरगच्चे, पुष्पावती पाटील, वंदना खोत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण सरोदे, मुख्याध्यापक अमोल माने शिक्षक परसराम सलगरे, संतोष ढोले, सविता डांगे ,शुभांगी पाटील, सतीश गस्ते, अंगणवाडी सेविका लता कांबळे,संध्या पाटील, मदतनीस ज्योती कांबळे, करिष्मा पुजारी उपस्थित होते.