धनंजय महाडिकांचे सतेज पाटलांना आव्हान, जिल्हा बँक, गोकुळसह सर्वच संस्थेत सत्तांतर घडेल
schedule30 Jul 22 person by visibility 992 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "कोल्हापूर विमानतळ येथे नाईट लँडिंग सुविधा आणि अन्य विकास कामासंबंधी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी अडीच वर्षात मंजुरी का आणली नाही." असा थेट हल्लाबोल खासदार धनंजय महाडिक यांनी केला. श्रेयवादामध्ये मला इंटरेस्ट नाही, विकासकामात मला रुची आहे. बास्केट ब्रिज कोणत्याही परिस्थितीमध्ये होणारच. शिवाय जििल्हा बॅॅंक,गोकुळसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या सहकारी संस्थांमध्ये सत्तांतर घडेल असेे संकेत ही त्यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमासाठी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.त्यानंतर प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी, माझी राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला. विमानतळ विस्तारीकरण, नाईट लँडिंग सुविधा यावरून सध्या श्रेयवाद सुरू आहे. खासदार महाडिक यांनी पाठपुरावा करून कोल्हापूर विमानतळ येथे नाईट लँडिंग सुविधा, धावपट्टी विस्तारीकरणास मंजुरी मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी नाईट लँडिंग सुविधा व धावपट्टी विस्तारीकरणासाठी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने व आपण प्रयत्न केले होते असे सांगितले. या श्रेयवादाविषयी महाडिक यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'श्रेयवादामध्ये मला इंटरेस्ट नाही. विकास कामात रुची आहे. विविध विकास प्रकल्प केला आहे. दुसरीकडे विरोधकांचे जे विकास प्रकल्प आहेत त्यामध्ये आपण पडणार नाही. मी माझ्या पद्धतीने विकासकामे करणार. थेट पाईपलाईन योजनेमध्ये मी पडणार नाही. थेट पाईप लाईन योजनेचे यश-अपयश हे त्यांचे. पाणी आणतो म्हणून सांगितलेले कितीतरी दिवाळी गे ल्या.आणखी किती दिवाळी येतील कोणास ठाऊक ? असा टोला आहे खासदार म्हणून महाडिक यांनी सतेज पाटील यांना लगावला. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारानंतर जिल्ह्यातील समीकरणही बदलत आहेत खासदार संजय मंडलिक व खासदार धनंजय महाडिक हे दोघेही आता सत्ताधारी घटकासोबत आहेत. खासदार मंडलिक यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. गेल्या निवडणुकीत मंडलिक आणि महाडिक एकमेकांविरोधात होते. याकडे लक्ष दिल्यावर खासदार महाडिक म्हणाले "संजय मंडलिक यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माझ्याशीही चर्चा झाली आहे. मात्र जी चर्चा झाली ती चर्चा काही खुली करणार नाही." राज्यातील सत्तेच्या घडामोडीनंतर जिल्ह्यातील राजकारणाविषयी बोलताना खासदार महाडिक म्हणाले, " लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला. विधानसभेला अमल महाडिक यांचा पराभव झाला. गोकुळ आमच्या हातातून निसटले. विधानपरिषदेला आम्हाला थांबावे लागले. त्यामुळे काही मंडळींनी महाडिकांना कधीच गुलाल लागणार नाही अशी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही कधी रणांगण सोडले नाही. आम्ही मैदानातच आहोत. मी लोकसभा खासदार असताना अनेक विकास प्रकल्प आणले. कोल्हापूर विमानतळ विकास, पासपोर्ट कार्यालय, ईएआय हॉस्पिटल, शिवाजी पुलासाठी मंजुरी अशी कितीतरी कामे सांगता येतील. आता एक खासदार म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवू." जिल्ह्यातील आगामी राजकारणाविषयी ते म्हणाले , "गेल्या अडीच वर्षात जी मंडळी आमच्यापासून फारकत घेऊन लांब होती ते आता परत संपर्कात येत आहेत. अनेकांचा प्रवेश होईल. जिल्हा परिषद व महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप व भाजपच्या विचारधारेचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील. जिल्ह्यातील प्रमुख सहकारी संस्थांमध्ये सत्तांतर होईल."