+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule30 Sep 24 person by visibility 144 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : १०० व्या नाट्यसंमेलनाच्या यानिमित्ताने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेतर्फे ४,५,६ ऑक्टोबर २०२४ रोजी सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला असून गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात कार्यक्रम संपन्न होणार आहे. अशी माहिती कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिली.
 संगीतसूर्य केशवराव भोसले यांची पुण्यतिथी दिनी ४ ऑक्टोबर रोजी  नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात होईल. यादिनी दुपारी ३.३० वाजता महोत्सवाचे उदघाटन उद्योग मंत्री व नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या हस्ते व पालकमंत्री हसन मुश्रीफ अध्यक्षतेखाली होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सतेज पाटील उपस्थित राहणार आहेत.  याप्रसंगी कोल्हापूर शाखेने यावर्षीपासून 'संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार' देण्याचे योजिले असून पहिला पुरस्कार कोल्हापूरचे नामवंत जेष्ठ नाट्यकर्मी डॉ. शरद भुथाडिया यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख २१ हजार रुपये व स्मृतिचिन्हे असे स्वरुप आहे. सिने -नाट्य अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृति पुरस्कार डॉ. भुथाडिया यांना दिला जाणार आहे. 
या पुरस्कार सोहळ्यानंतर लगेचच "संकर्षण कऱ्हाडे आणि स्पृहा जोशी यांचा संकर्षण व्हाया स्पृहा" हा सध्या महाराष्ट्रात तुफान लोकप्रियता मिळवलेला कवितांचा कार्यक्रम सादर होणार आहे.  शनिवारी  ५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता शंभराव्या संमेलनाच्या निमित्ताने नाट्य परिषद, मुंबईने सादर केलेला 'नाट्य कलेचा जागर' हा विशेष कार्यक्रम होणार आहे. यात एकांकिका, नाट्य पद गीत गायन, एकपात्री, नाट्यछटा अशा अंतिम फेरीतील विजेत्यांचे सादरीकरण होणार आहे. याच दिवशी सायंकाळी ५ वा बहुचर्चित 'अमेरिकन अल्बम' या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.
 रविवारी ६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायं. ४.३० वाजता या महोत्सवाचा समारोप होईल. समारोप प्रसंगी डॉ. वासुदेव देशिंगकर संकलित व संशोधित 'मराठी रंगभूमीचे प्रतिभावंत नाटककार' या पुस्तकाचे प्रकाशन जेष्ठ अभिनेते मोहन जोशी व बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा अभिनेत्री ॲड. नीलम शिर्के- सामंत यांच्या हस्ते होईल. तसेच याप्रसंगी यावर्षी कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विद्यासागर अध्यापक, मयूर कुलकर्णी, सागर बगाडे, मंजुश्री गोखले यांचा आणि ऑलिंपिक मेडल मिळवल्याबद्दल स्वप्नील कुसाळे यांचा सन्मान केला जाणार आहे. यानंतर नाट्यसंपदा कला मंच, मुंबई निर्मित अभिराम भडकमकर लिखित आणि ऋषिकेश जोशी दिग्दर्शित 'गोष्ट संयुक्त मानापमानाची' हा नाट्यप्रयोग सादर होऊन या सांस्कृतिक महोत्सवाची सांगता होईल. अशी माहिती कोल्हापूर शाखेचे प्रमुख कार्यवाह गिरीश महाजन यांनी दिली.  तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी सर्व रसिक प्रेक्षकांनी यावे असे नाट्य परिषद कोल्हापूर शाखेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. रसिक प्रेक्षकांसाठी हा महोत्सव विनामूल्य ठेवण्यात आला आहे.