Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या क्रिएटिव्ह शिक्षकांचा अभ्यास दौरा, जागतिक स्तरावरील शाळा भेटीचाधूल चेहरे पे थी, लेकिन आईना साफ करता रहा ! मुश्रीफांचा संजय मंडलिकांना उद्देशून टोलानगरसेवकांच्या पसंतीतून गटनेत्याची निवड, घोषणा कोल्हापुरातून नव्हे भाजपा प्रदेशकडून होणारमहापौर - उपमहापौर निवड तीस किंवा ३१ जानेवारीला! महापालिकेने मागविले निवडीसंबंधी मार्गदर्शन ! !शिवसेनेतर्फे शिवसेनाप्रमुखांना अभिवादन, नूतन नगरसेवकांचा सत्कार क्रीडाई कोल्हापूरतर्फे तीस जानेवारीपासून चार दिवसीय दालन प्रदर्शन ! वास्तू विषयक १७० स्टॉल्सचा समावेश ! !भाजपकडून शिराळे, खाडे, देसाई, कुंभारांची नावे चर्चेत ! शिवसेनेचाही महापौरपदावर दावा !!कोल्हापूर - इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव !जिल्हा परिषदेची निवडणूक, कार्यकर्त्यांच्या सन्मानाची ! कार्यकर्त्यांना पद, राजकारणात मोठं करणं हा महाडिक पॅटर्न ! !भाजपकडून जिपसाठी ४१, पंचायत समितीसाठी ७२ उमेदवार ! काही तालुक्यात स्वतंत्र, काही ठिकाणी युती! !

जाहिरात

 

सीपीआरमधील वैद्यकीय बिलांच्या चौकशीसाठी समिती, पालकमंत्र्यांचे आदेशाने समिती स्थापन

schedule09 Dec 25 person by visibility 304 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : छत्रपती प्रमिनाराजे रुग्णालयात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतकीबिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक लूट होत असल्यावरुन टीकेची झोड उठल्यानंतर  या साऱ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर चौकशी समिती स्थापन केली. शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे व इतर पदाधिकाऱ्यांनी सोमवारी आठ डिसेंबर रोजी सीपीआर येथे वैद्यकीय बिलांच्या मंजुरीतील भ्रष्टाचारा विरोधात  आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी जिल्हा चिकित्सकांच्या सोबत एका रूमची तपासणी केली. त्या ठिकाणी आढळलेल्या डायरीमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी मॅडम व सर यांना दिलेल्या रकमेच्या  नोंद आढळल्या. या साऱ्या प्रकाराची सरकारने गंभीरतेने दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषीवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.

 जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात वैद्यकीय बिलांसाठी घेतलेल्या रकमेची नोंदवही सापडल्याने वैद्यकीय देयेके पारित करण्यासाठी भ्रष्टाचार झाल्याचे मुद्दे माध्यमांमध्ये समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आबिटकर यांनी उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.या समितीत उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ (अध्यक्ष), सहायक संचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर (हिवताप), आणि जिल्हा शल्यचिकित्सक, सांगली यांचा समावेश आहे. उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ यांनी कार्यालयीन आदेश जारी करून समितीची स्थापना केली आहे.कोल्हापूर मंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. दिलीप माने हे चौकशी समितीचे अध्यक्ष आहेत. तर चौकशी समिती समिती सदस्य म्हणून सहायक संचालक आरोग्य सेवा संजय रणवीर, सांगली येथील जिल्हा शल्यचिकित्सक दिपक वरक काम पाहणार आहेत. ही समिती  सविस्तर चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes