Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कार्यकर्त्यांच्या अंगाला हात लावून तर बघा, राजेश क्षीरसागर हा षंढ नाही ! सतेज पाटलांना चॅलेंजकागल, करवीर, राधानगरीत चुरशीने मतदान ! जिल्ह्यात सायंकाळ सहानंतरही २०० केंद्रावर मतदारांच्या रांगा !!कसबा बावडा, सदरबझारमध्ये कार्यकर्ते आमनेसामने, घोषणाबाजीने तणावाची स्थिती नेते-उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क ! मतदारांत उत्साह, सकाळी ९ पर्यंत ७.३८ मतदान !!दाक्षिणत्या सिनेमाला साजेसा अॅक्शनपट मराठीत, रानटी चित्रपट २२ नोव्हेंबरपासून प्रदर्शितजिल्ह्यातील ३३ लाख मतदारासाठी मतदान केंद्रे सज्ज, शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावावा -जिल्हाधिकारी अमोल येडगेजैन कल्याणक सर्किटसाठी ललित गांधींना लखनौ भेटीचे निमंत्रणगोकुळच्या कार्यक्रमात उलगडले आनंदी तणावमुक्त जीवनचे रहस्यअभियांत्रिकीच्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानप्रेमी बनवावे -निखिल पडतेसर्व घटकांच्या भरघोस पाठिंब्यामुळे अमल महाडिक हेच विजयाचा गुलाल उधाळणार -शौमिका महाडिक

जाहिरात

 

पालकमंत्र्यांच्या जिल्हा परिषदेतील कारभाऱ्याने बंधारा पळवला-अमर चव्हाणांची टीका

schedule07 Nov 24 person by visibility 54 categoryराजकीय

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अत्याळ आणि लिंगनूर दरम्यान बंधारा होणार होता.पण तो कागदावरच राहिला. कारण कौलगे-कडगाव जिल्हा परिषदेच्या कारभाऱ्याने पालकमंत्री हसन मुश्रीफांच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाला हाताशी धरुन स्वतःच्या फायद्यासाठी हा बंधारा एक किलोमीटर पुढे नेला. बंधाऱ्याची जागा बदलल्यामुळे लिंगनूर, अत्याळ गावातील शेकडो एकर जमीन मुबलक पाण्यापासून वंचित राहिली. धरणात पाणीसाठा मुबलक असून सुद्धा शेतकऱ्याला शेतीसाठी मुबलक पाणी मिळत नाही. मुश्रीफांनी या भागातील लाडक्या नेत्याच्या फायद्यासाठी शेकडो शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम केले आहे. असे प्रतिपादन अमर चव्हाण यांनी केले.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ लिंगनुर कसबा नूल येथे आयोजित केलेल्या जाहीर सभा झाली. याप्रसंगी बोलताना जनता दलाच्या स्वाती कोरी म्हणाल्या, ‘ गेली पंधरा वर्षे गडहिंग्लजसह उत्तुर-कडगाव- कौलगे मतदार संघातील जनतेने मुश्रीफांना मतदानाच्या माध्यमातून बळ दिले. त्या जनतेची अस्मिता असलेल गडहिंग्लजचा गोड साखर कारखाना स्वःताच्या स्वार्थासाठी बंद पाडण्याचे पाप हसन मुश्रीफांनी केले.
 उमेदवार समरजितसिंह घाटगे म्हणाले,"गेली पंचवीस वर्षे सत्तेत असणाऱ्या मुश्रीफांनी या भागातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून गडहिंग्लज एमआयडीसीत एक मोठा प्रकल्प आणता आला नाही. आयटी पार्क तसेच उद्योगधंदे आणण्याची खोटी आश्वासने त्यांनी दिली. या भागातील शिक्षण घेतलेल्या तरुणासाठी त्यांनी
एमपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी एकही प्रशिक्षण केंद्र सुरू केले नाही. सत्ता मिळाल्यास नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करू त्यामुळे येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांना पुणे मुंबईला जावे लागणार नाही.
 उपसरपंच संतोष पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ॲड सुरेश कुराडे,ॲड दिग्विजय कुराडे,बाबासाहेब पाटील, अमरसिंह चव्हाण,अण्णासाहेब पाटील, दिलीप माने, प्रकाश कुंभार, श्रीपती कदम यांची भाषणे झाली. सभेस बाळासाहेब मोरे मामा, सुधाकर जगताप,रणजितसिंह पाटील,अनिल पाटील, संदीप पाटील अशोक चोथे,गणपती येसरे, दत्तात्रय जोशीलकर, सुरेश संकपाळ, तानाजी जोशीलकर , सुभाष पाटील, निंगोडा पाटील, राहुल कुरळे, सुभाष वाघे, संभाजी वाघे उपस्थित होते.
 

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes