उत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम
schedule21 Oct 24 person by visibility 195 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सध्याचे जग हे स्पर्धेचे आहेे. या स्पर्धेमध्ये उत्तम करिअर करायचे असेल तर आपल्याकडे उत्तम संवाद कौशल्य असावे असे प्रतिपादन कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी केले.
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये इंग्रजी विभागामार्फत आयोजित अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. मगदूम बोलत होते. कॉमर्स कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. एस. नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत शहरातील विविध कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
पहिल्या सत्रामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख डॉ. ए. एम. सरवदे यांनी विद्यार्थ्यांना संवादाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा ब्रँड कसा विकसित करावा यावर मार्गदर्शन केले. न्यू कॉलेजमधील सहाय्यक प्रा. डॉ अरुंधती पवार यांनी संवादामध्ये देहबोली किती महत्त्वाची असते यावर मार्गदर्शन केले. कमला कॉलेज इंग्रजी विभागप्रमुख एम.एन.चव्हाण यांनी संवादाचा व्यक्तिमत्व विकासावर होणारा परिणाम यावर मार्गदर्शन केले.
डॉ. एस एस जमादार यांनी सूत्रसंचालन केले. कॉलेजमधील इंग्रजी विभागप्रमुख संतोष गवई यांनी आभार मानले. यावेळी अग्रणी महाविद्यालय समन्वयक डॉ. देसाई, आयक्यूएसी समन्वयक डॉ.एस.बी राजमाने, डॉ आय.एस. मुलानी , ओंकार मुगडे अजय नाईक उपस्थित होते.