भाजप कोल्हापूर महानगरची २५ जणांची कार्यकारिणी घोषित ! चार सरचिटणीस, आठ उपाध्यक्ष !
schedule13 Aug 25 person by visibility 272 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पक्ष,कोल्हापूर महानगरची कार्यकारिणीची घोषणा झाली आहे. २५ जणांची कार्यकारिणी आहे. यामध्ये चार सरचिटणीस आणि आठ उपाध्यक्ष आहेत. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब झाले. तर बुधवारी (१३ ऑगस्ट) खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या मागंदर्शनानुसार महानगर अध्यक्ष विजय जाधव यांनी कार्यकारिणी घोषित केली.
आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक पातळीवर काम करणाऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. कार्यकारिणीत तरुण चेहऱ्यांचा समावेश आहे. तर मागील कार्यकारिणीतील काहींना डच्चू दिले आहे. दरम्यान बुधवारी जाहीर केलेल्या भाजपा कोल्हापूर महानगर कार्यकारिणीत सरचिटणीसपदी राजू मोरे, अमर साठे, विराज चिखलीकर, धनश्री तोडकर यांची नियुक्ती करण्यात आली. महानगर अंतर्गत आठ उपाध्यक्ष नेमले आहेत. उपाध्यक्षपदी डॉ. सदानंद राजवर्धन, रुपाराणी निकम, संतोष लाड, हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर, गणेश देसाई, शैलेश पाटील, अजित सुर्यवंशी यांची घोषणा झाली आहे. चिटणीसपदी जयराज निंबाळकर, अतुल चव्हाण, दिग्विजय कालेकर, हेमंत कांदेकर, दिपक काटकर, मंगला निपाणीकर, संतोष भिवटे, प्रदीप उलपे , संतोष सदाशिव माळी यांची नावे घोषित केली. कोषाध्यक्षपदी माजी नगरसेवक राजसिंह शेळके आहेत.
भाजपशी निगडीत विविध मोर्चाच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये युवा मोर्चा अध्यक्षपदी विश्वजीत पवार, महिला मोर्चा अध्यक्षपदी माजी नगरसेविका माधुरी नकाते, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी महेश यादव, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी अनिल कामत, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी आजम जमादार आहेत.