कन्व्हेन्शन सेंटरला प्रशासकीय मंजुरी ! राजेश क्षीरसागराच्या प्रयत्नांचे फलित!!
schedule15 Oct 24 person by visibility 278 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर साकारावे यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले. राज्य सरकारने कोल्हापुरातील कन्व्हेन्शन सेंटरला प्रशासकीय मंजुरी दिली.
आचारसंहीतेच्या पूर्वसंध्येपूर्वीच क्षीरसागर यांनी या सेंटरला सरकारी मंजुरी मिळविण्याचा मास्टरस्ट्रोक लगावला. त्यामुळे कन्व्हेक्शन सेंटरचे काम आचारसंहितेच्या कात्रीतून बाहेर सुटण्यास मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा झपाट्याने विस्तार होत असून, औद्योगिक, व्यापार, बांधकाम, कृषी या क्षेत्रातील सुरु असणारी घोडदौड त्यानुषंगाने सामाजिक, वैचारिक, राजकीय, सांस्कृतिक अभिसरण या सर्वांचा विचार करता विविध संघटनांच्या सामुहिक बैठका, विचारांचे अदान-प्रदान करण्यासाठी सरकारचे अधिकृत कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापुरात असावे अशी मागणी क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ०९ जानेवारी २०२३ रोजी लेखी पत्राद्वारे केली होती. याबाबत तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांना दिले होते. त्यानंतर कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याबाबत सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दोन हजार प्रेक्षक क्षमतेचे अत्याधुनिक नॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. क्षीरसागर यांनी पुन्हा मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या अर्थसंकल्पात कन्व्हेन्शन सेंटरसाठी निधीची तरतूद होण्याची मागणी केली होती.
परंतु, कन्व्हेक्शन सेंटरचे काम आचार संहितेमुळे लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली असताना क्षीरसागर यांनी सोमवारी थेट मुंबई गाठून मंगळवारी आचारसंहितेच्या पूर्वीच या कामाची प्रशासकीय मंजुरी घेवून पुन्हा एक मास्टर स्ट्रोक लगावला. गेल्या अडीच वर्षापासून क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरात