Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक संघ थोरात गटाची कोल्हापूर शहर कार्यकारिणीची घोषणाजगातील प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत होण्याचा अधिकार – डॉ. विजय ककडेतरुणांनी ध्येय प्राप्तीसाठी स्वप्नांची - कृतीची जोड द्यावी : डॉ. कृष्णा पाटीलडीवाय पाटील विद्यापीठात स्पोर्ट्स सायन्स अभ्यासक्रमाचा शुभारंभआकाश एज्युकेशनलतर्फे अँथे २०२५ ची घोषणसंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मुळशीला  प्रथम क्रमांकाचा उदयोन्मुख शाळा पुरस्कारऔद्योगिक वीजग्राहकांसाठी अद्यावत स्वागत सेल, महावितरणकडून  अधिक जलदगतीने सेवा !कोल्हापूरचा बॅडमिंटन संघ संभाजीनगरातील आंतरजिल्हा स्पर्धेसाठी रवाना भाजप कोल्हापूर महानगरची २५ जणांची कार्यकारिणी घोषित ! चार सरचिटणीस, आठ उपाध्यक्ष !कोल्हापुरात भरदुपारी घरफोडी, डॉक्टरांच्या घरातून ५० तोळयांचे दागिने लंपास

जाहिरात

 

सांगलीच्या विद्यार्थिनीची विद्यापीठातील होस्टेलमध्ये आत्महत्या, कॅम्पस बनला सुन्न, मैत्रिणींना अश्रू अनावर

schedule11 Aug 25 person by visibility 666 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात एमएस्सी भूगोल भाग एक या वर्षात शिकत असलेली विद्यार्थिनी गायत्री पंढरीनाथ रेळेकर हिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (११ ऑगस्ट २०२५) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वसितगृह क्रमांक एकमधील खोलीत ही घटना घडली. राजारामपुरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद आहे. विद्यार्थिनी रेळेकर ही सांगलीवाडी येथील आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली. विद्यार्थिनींच्या आत्महत्येच्या घटनेने विद्यापीठ परिसर सुन्न झाला. वसतिगृहातील वातावरण शोकाकूल बनले होते. तिच्या मैत्रिणींना अश्रू अनावर झाले. मृत्यूसमयी गायत्रीचे वय २१ वर्षे होते.

कुलगुरू डी. टी. शिर्के, प्रकुलगुरू प्रमोद पाटील, कुलसचिव व्ही. एन. शिंदे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक तानाजी चौगले, वसतिगृहाच्या अधीक्षक डॉ. मीना पोतदार,  सिनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. गायत्रीच्या नातेवाईकही सांगलीवाडीतून विद्यापीठात दाखल झाले. वसतिगृह परिसरात तिच्या पालकांनी व नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवळून टाकणारा होता. कुटुंबांतील सदस्यांनी तिच्या मृतदेहाचे शेंडापार्क येथील शवविच्छेदनगृहात शवविच्छेदन करण्यास विरोध केला. यामुळे काही वेळ तणावाची स्थिती होती.

गायत्री ही सांगली येथील सांगलीवाडी येथील आहे. आठ ते ११ ऑगस्ट या कालावधीत ती गावाकडे गेली होती. सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गायत्री वसतिगृहात परतली. तिने, वडिलांना फोन करुन वसतिगृहात पोहोचले असल्याचे सांगितले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मैत्रीण विभागातून परतली. यावेळी  दरवाजा बंद होता. मैत्रिणीने दरवाजावर थाप मारली वाजविला. हाका मारल्या. मोबाईलवर संपर्क साधला. पण कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी मैत्रिणीने, अन्य विद्यार्थिनींच्या सहाय्याने टेबलवर उभे राहून खिडकीचा पडदा सरकावत खोलीत पाहिले. यावेळी साऱ्यांनाच धक्का बसला. गायत्रीने ओढणीने फॅनला गळफास घेतला होता. त्या साऱ्यांनी होस्टेलच्या अधीक्षक व सुरक्षारक्षकांना बोलाविले. दरवाजा तोडला. एव्हाना राजारामपुरी पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी गर्दी पांगवली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes