कोल्हापुरात भरदुपारी घरफोडी, डॉक्टरांच्या घरातून ५० तोळयांचे दागिने लंपास
schedule13 Aug 25 person by visibility 42 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील न्यू शाहूपुरी परिसरातील अनंत प्राइड अपार्टमेंटमध्ये मंगळवारी (१२ ऑगस्ट) भरदुपारी घरफोडीचा प्रकार घडला. छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलमधील मेडिसीन विभागप्रमुख डॉ. अनिता अरुण परितेकर (वय ५७ वर्षे) यांच्या घरातील ५० तोळे सोने चोरटयांनी दागिने लंपास केले. परितेकर यांनी मुलगा आणि नातीच्या लनासाठी हे दागिने ठेवले होते. फ्लॅटचा कडी-कोयंडा उचकटून कपाटातील तीस तोळे सोन्यासह हिऱ्याचो दागिने पळविले. यामध्ये तीन मंगळसूत्रे, कर्णफुले, सोनसाखळी, विविध आकाराच्या अंगठया, तोडे, ब्रेसलेट, हिऱ्याचे टॉप्सचा समावेश आहे. एकूण ५५ लाख रुपये किंमतीचे दागिने आहेत. शिवाय २५ हजार रुपयासह मोबाइलही लंपास केला आहे. परितेकर, पती-पत्नी दोघेही डॉक्टर आहेत. शाहूपुरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. श्वान पथकाच्या साहाय्याने चोरटयाचा माग काढण्याचा प्रयत्न झाला, पण काही धागेदोरे हाती लागले नाहीत. पोलिसांकडून चोरटयांचा शोध सुरू आहे.