एकच मिशन - जुनी पेन्शनचा घुमला नारा ! कलेक्टर ऑफिससमोर निदर्शने !!
schedule09 Aug 23 person by visibility 1968 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "एकच मिशन जुनी पेन्शन " अशा घोषणा देत सरकारी कर्मचाऱ्यांनी व शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. खाजगीकरण व कंत्राटी कणपद्धतीलाही जोरदार विरोध केला. सरकारने तत्काळ सरकारी कर्मचाऱ्यांच्या व शिक्षकांच्या मागण्या विचारात घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा या मागण्याचे निवेदन ही उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांना दिले.
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना कोल्हापूर शाखा, प्राथमिक शिक्षक समिती, खाजगी शिक्षक सेवक समिती व जुनी पेन्शन कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी 9 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व अधिकाऱ्यांना निवेदन असेज्ञ आंदोलन जाहीर केले होते. जिल्हा प्रशासनाने बाईक रॅलीला परवानगी नाकारल्यामुळे संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन जुनी पेन्शन योजनेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. दुपारी साडेबारा वाजता सुमारास आंदोलन झाले. सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना कृती समितीचे निमंत्रक अनिल लवेकर, वसंत डावरे, खाजगी शिक्षक सेवक समितीचे भरत रसाळे, शिक्षक समितीचे सुधाकर सावंत, गव्हर्नमेंट बँकेचे संचालक प्रकाश पाटील यांच्यासह सरकारी कर्मचारी व विविध संघटनाच्या प्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतला.
"एकच मिशन जुनी पेन्शन, कंत्राटीकरण व खासगीकरण रद्द करा"अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी लक्ष वेधले. उपजिल्हाधिकारी खिलारे यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. शिष्टमंडळात सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना कोल्हापूर शाखेचे विठ्ठल वेलणकर , सत्यजित ढेकळे, संजीवनी दळवी, पूनम पाटील, नंदकुमार इंगवले, अंकुश रानमाळे, शिक्षक समितीचे संजय पाटील संजय कांडगावे, मयूर जाधव, जिल्हाधिकारी कार्यालयातील संदीप कांबळे, राहुल शिंदे, पंडित पांडे आदींचा सहभाग होता. दरम्यान विविध सरकारी कार्यालय व शाळेमध्ये जुनी पेन्शन योजनेसाठी आंदोलने केली.