महाराणी ताराराणींच्या ३५० व्या जन्मवर्षानिमित्त रविवारी विद्यापीठात कार्यक्रम
schedule12 Oct 24 person by visibility 139 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून विविध उपक्रमांचे आयोजन केलेले आहे . महाराणी ताराराणी यांच्या जीवन चरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर येथे होणार आहे.
सहा महसुली विभागापैकी पुणे विभागातील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजामाता सभागृह, शिवाजी विद्यापीठ येथे १३ ऑक्टोबर,२०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता केले आहे. या कार्यक्रमाला सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच स्थानिक खासदार आमदार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. रसिक प्रेक्षकांना हा कार्यक्रम विनामूल्य असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी भरभरून उपस्थिती लावावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक विभीषण चावरे यांनी केले आहे.
महाराणी ताराराणी यांच्या जीवन कार्यावरवर आधारित विद्वत्त परिषदेचे आयोजन कोल्हापूर विद्यापीठामध्ये करण्यात येणार आहे. तसेच महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षाचा भाग म्हणून महाराष्ट्राच्या सहा महसुली विभागात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रयोगात्मक कलेच्या माध्यमातून महाराणी ताराराणी यांच्या जीवन चरित्राचे सादरीकरण जनसामान्यापुढे करण्यात येणार आहे. त्यामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळेल. मंत्री मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून या उपक्रमाचे सादरीकरण होणार आहे.