पिस्तुलचा धाक दाखवून १३ लाख लुटणारी टोळी जेरबंद
schedule20 Aug 24 person by visibility 338 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून तेरा लाख रुपये लुटणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याने संयुक्तपणे कारवाई केली. अभिषेक विजय कागले (रा. युवराज कॉलनी पाचगाव, ता. करवीर ,अशिष निळकंठ कागले (वय ३१, रा. ऋषिकेश कॉलनी पाचगाव), बाळकृष्ण श्रीकांत जाधव (वय ३५ रा. पाचगाव )अमरजीत अशोक लाड (वय ४१, रा. लाईन बाजार, कसबा बावडा) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी संशयितांकडून रोख अकरा लाख ३५ हजार दोनशे रुपये ,दोन कार ,एक मोपेड, तीन मोबाईल हँडसेट, एक पिस्तूल, चाकू असा ३२ लाख २१ हजार ४० हजार रुपये असा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासाची माहिती दिली. १७ ऑगस्ट रोजी शहाजी लॉ कॉलेज जवळील गजलता, आर्केड या इमारतीमध्ये बांधकाम साहित्याची विक्री करणाऱ्या एजन्सीची कार्यालय आहे. या कार्यालयात दुपारी दोनच्या सुमारास हेल्मेट आणि मास्क घालून आलेल्या चार संशयितांनी दुकानातील कामगार लक्ष्मण विलास काणेकर (रा. दौलत नगर) याच्या पोटावर पिस्तूल लावून आणि मानेवर चाकू लावून त्याला चिकट टेपने खुर्चीला बांधले. त्याच्याकडे 'पैसा किधर है 'असे विचारणा केली. त्यानंतर चोरट्यांनी गल्ल्यातील १३ लाख २९ हजार ४०० रुपये लुटून नेले. या घटनेची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्ह्याचा तपास करण्याचा आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिला. एलसीबी आणि शाहूपुरी संयुक्त तपास करण्यासाठी आठ पथके तयार केली .या पथकाने तपास सुरू केला असता गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांना तपासासाठी एक धागा सापडला. या गुन्ह्यातील तीन संशयितांनी गुन्ह्यात वापरलेल्या कारमध्ये एकत्र बसून गेल्याची माहिती मिळाली. त्यातील एका संशयिताचे पाचगाव येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी फॅब्रिकेशन व्यवसायिक अभिषेक कागले याला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अशिष निळकंठ कागले आणि बाळकृष्ण जाधव यांची नावे सांगितली. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन अभिषेक ,आशिष, आणि बाळकृष्ण यांच्याकडे कसून चौकशी केली असता तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्याचा कट अमरजीत अशोक लाड याने रचल्याचे सांगितले .अमरजीत हा पुलाची शिरोली येथील शिर्डी स्टील दुकानात कामगार आहे. गुन्हा घडण्यापूर्वी काही काळ अगोदर त्याने शिर्डी स्टीलचे चार लाख २९ हजार चारशे रुपये बांधकाम साहित्य विक्री करणाऱ्याच्या कार्यालयात जमा केले असलेले सांगितले. त्या ठिकाणी मोठी रक्कम असल्याची माहिती ही त्याने अभिषेक कागले आशिष कागले आणि बाळकृष्ण जाधव यांना सांगितले. त्यानंतर हेल्मेट आणि मास्क घालून संशयितांनी तेरा लाख रुपयांची लूट केली. पोलिसांनी यशस्वी तपास करून संशयितांकडून रोख अकरा लाख ३५ हजार दोनशे रुपये, दोन कार ,एक मोपेड ,तीन मोबाईल, एक पिस्तूल असा ३१ लाख २१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे रवींद्र कळमकर ,शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मसुगटे, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, संदीप जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुळे, एलसीबीचे पोलीस अंमलदार सुरेश पाटील, सागर माने , विजय इंगळे, संजय कुंभार, रामचंद्र कोळी, कृष्णात पिंगळे, विनोद कांबळे, हिंदुराव केसरे, रोहित मर्दाने, अमोल कोळेकर ,विलास किरोळकर, सुनील पाटील, परशुराम गुजरे , अमित सर्जे, संजय पडवळ, दीपक घोरपडे, राकेश राठोड, नामदेव यादव ,शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संदीप जाधव, मिलिंद बांगर, लखन पाटील, शुभम संकपाळ, संदीप बेंद्रे, महेश पाटील, रवी आंबेकर, बाळासाहेब ढाकणे विकास चौगुले यांचा तपासात सहभाग होता.