जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात ३५० महिला शेतकऱ्यांचा सहभाग
schedule24 Aug 24 person by visibility 232 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाला प्रतिसाद लाभला. कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी सभागृहात महोत्सव झाले.
सुमारे 350 महिला शेतकरी व शेतकरी गटांनी रानभाजी महोत्सवात सहभाग घेतला. या महोत्सवामध्ये शेवगा, करटुले, रान, कोवळे बांबू, अळू, लाल, केन, पाथरी, मटारु, कपाळफोडी, आघाडा, आंबाडा, व्हनगोती, रान कारली, माठ, भांगीरा, घोळ, कुर्ड, गुणुवली, शेंडवेल, तोंडली इ. रानभाज्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधले.
आमदार सतेज डी. पाटील, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अजय कुलकर्णी, आत्मा प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर, सिध्दगिरी कृषि विज्ञान केंद्र, कणेरी गृह विज्ञान शास्त्रज्ञ डॉ. प्रतिभा ठोंबरे, करवीर विभागीय कृषि अधिकारी अरुण भिंगारदिवे, कोल्हापूर विभागीय कृषि अधिकारी जयश्री हावळे, करवीर तालुका कृषि अधिकारी बंडा कुंभार यांची उपस्थित होते.
कृषि विभागामार्फत विविध महोत्सव तसेच नाविण्यपूर्ण संकल्पना शेतकऱ्यांसाठी राबवित आहे, यांचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा. आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्या वापर आपल्या दैनंदिन आहारात करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत होते. या भाज्यांचे संवर्धनही करणे गरजेचे असल्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रानभाज्यांचे नमुने व त्यांची पाककृती स्पर्धेतून निवडलेल्या महिलांचा हस्ते सत्कार करण्यात आला.