Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
यंदा अकरावीचे प्रवेश ऑनलाइन प्रक्रियेद्वारेच ! विद्यार्थ्यांनी ऑफलाइन प्रवेश घेऊ नये !!पोलिसांच्या वागणुकीचा फटका आमदारांना, शेतकऱ्यांची अडवणूक ! संघर्ष समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणीजिल्ह्यातील पन्नास हजार घरकुलांचे काम २६ जानेवारीपर्यत पूर्ण होणार-पालकमंत्री प्रकाश आबिटकरपुण्यातून आमदार-सांगलीचा पालकमंत्री असलो तरी कोल्हापूरच्या विकासाला फर्स्ट प्राधान्य –मंत्री चंद्रकांत पाटीलआनंदयात्री फेसबुक समूहातर्फे मंगळवार एकांकिका सादरीकरणधनंजय महाडिकांकडून कबड्डीपटूंना बक्षीसाचे बोनस ! बारा खेळाडूंना प्रत्येकी दहा हजार प्रदान !!वारणा महाविद्यालयात कॅन्सर संशोधनाला आंतरराष्ट्रीय पेटंटउद्योजकांच्या हस्ते बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटनअलमट्टी धरणाच्या उंचीच्या विरोधात सर्वपक्षीयांचे चक्काजाम आंदोलन, खासदार-आमदारांचा महामार्गावर ठिय्या!गोकुळच्या अध्यक्षपदाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

जाहिरात

 

कोल्हापूर ते पुणे मार्गावर आता स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस

schedule12 Sep 24 person by visibility 585 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : हुबळी ते पुणे या मार्गावर नव्याने सुरू होणार्‍या वंदे भारत एक्सप्रेसला, कोल्हापूरचा थांबा देण्यात आला होता. पण त्यामुळे काही नवे वाद निर्माण झाले होते. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांच्यासह कोल्हापुरातील अन्य काही लोकप्रतिनिधींनी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधून, कोल्हापूरसाठी स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस देण्याची मागणी केली. त्यानुसार आता आठवड्यातील तीन दिवस, कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर या मार्गावर स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. १६ सप्टेंबर पासून, कोल्हापूर ते पुणे या मार्गावर नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल, अशी माहिती खासदार महाडिक यांनी दिली आहे.
हुबळी ते पुणे या मार्गावर १५ सप्टेंबरपासून नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. हीच गाडी मिरजेहून कोल्हापूरला येईल आणि कोल्हापुरातील प्रवाशांना घेऊन पुन्हा मिरज मार्गे पुढे जाईल, असे नियोजन करण्यात आले होते. पण या प्रस्तावाला मिरज आणि कर्नाटक मधील अनेक प्रवाशांनी विरोध दर्शवला. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधून, कोल्हापूर ते पुणे या मार्गावर स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, अशी आग्रही मागणी केली. त्यानुसार येत्या १६ सप्टेंबर पासून, आठवड्यातील तीन दिवस, कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर, वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी सव्वा आठ वाजता, कोल्हापुरातून वंदे भारत एक्सप्रेस सुटेल आणि दुपारी दीड वाजता पुण्यात पोहोचेल. तर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी सव्वा दोन वाजता, पुण्यातून वंदे भारत एक्सप्रेस सुटेल आणि सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी ही गाडी कोल्हापुरात येईल. मिरज - सांगली - किर्लोस्करवाडी- कराड आणि सातारा या स्थानकांवर ही नवी वंदे भारत एक्सप्रेस थांबणार आहे. त्यामुळे प्रदीर्घ काळापासून कोल्हापूरकरांची असलेली मागणी पूर्णत्वास आली आहे. लवकरच कोल्हापूर ते मुंबई या मार्गावरही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल, असे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes