+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्रयाग चिखली उपसरपंचपदी शारदा कांबळे adjust काँग्रेसची यादी, ऋतुराज पाटील, राहुल पाटील, राजू आवळेंचा समावेश ! विश्वजीत कदम, विक्रम सावंताची उमेदवारी !! adjustशरद पवार गटातर्फे इस्लामपुरातून जयंत पाटील, कागलमध्ये समरजित, तासगावात रोहित पाटील ! चंदगड, इचलकरंजी वेटिंगवर !! adjustचार विद्यमान-तीन माजी आमदारासह २२ जणांचे उमेदवारी अर्ज, शक्तीप्रदर्शनाने भरली रंगत adjust वेस्ट झोन शूटींग चॅम्पियनशिप स्पर्धेेत पृथ्वीराज महाडिकांचा सुवर्णवेध adjustआमची बांधिलकी शेतकऱ्यांशी, चिंताही शेतकऱ्यांचीच ! सतेज पाटलांचे वक्तव्य पोरकटपणाचे-हसन मुश्रीफांचा पलटवार adjustहातकणंगलेतील शिक्षकांच्या कामाचा वेळेत निपटारा-गटशिक्षणाधिकाऱ्यांची पुरोगामीला ग्वाही adjustअभिषेक मिठारींकडून शरण साहित्य अध्यासनास अकरा हजार रुपयांची देणगी adjustकागलमधून समरजितसिंह घाटगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल adjustमहाविकास आघाडीतर्फे कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजे किंवा राजेश लाटकर
1001157259
1001130166
1000995296
schedule24 Oct 24 person by visibility 130 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गट, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यापाठोपाठ काँग्रेस पक्षानेही विधानसभा निवडणुकीसाठी ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये साकोली मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिणमधून तर संगमनेर येथून माजी मंत्री व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांची उमेदवारी ब्रह्मपुरी मतदारसंघासाठी जाहीर झाली. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर दक्षिणमधून विद्यमान आमदार ऋतुराज संजय पाटील, करवीरमधून दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, हातकणंगलेतून विद्यमान आमदार राजू आवळे यांचा समावेश आहे. कोल्हापूर उत्तरची उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही .
सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार विश्वजीत कदम, जतचे आमदार विक्रम सावंत यांची उमेदवारी घोषित केली. लातूर ग्रामीण व लातूर शहरमधून विद्यमान आमदार धीरज विलासराव देशमुख व अमित विलासराव देशमुख हे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीत पहिल्या टप्प्यात जागा वाटपाच्या फॉर्म्युलानुसार प्रत्येकी ८५ जागा मिळाल्या आहेत. उर्वरित ३३ जागांचे वाटप अजून व्हायचे आहे. काँग्रेसने गुरुवारी, २४ ऑक्टोबर २०२४ रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
काँग्रेसचे अन्य उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत…
 धुळे मतदारसंघातून कुणाल रोहिदास पाटील, रावेरमधून अॅड. धनंजय शिरीष चौधरी, मलकापूर येथून राजेश पंडितराव एकडे, चिखलीतून राहुल बोंद्रे, रिसोडमधून अमित सुभाषराव झनक, अमरावती येथून डॉ. सुभाषराव देशमुख, तिवसा येथून माजी मंत्री यशोमती ठाकूर, देवळीतून रणजीत प्रताप कांबळे, कसबा पेठ येथून आमदार रवींद्र धंगेकर, देवळी – रणजीत प्रताप कांबळे, नागपूर दक्षिण पश्चिम- प्रफुल्ल विनोदराव गुडथे, नागपूर मध्य- बंटी बाबा शेळके, नागपूर पश्चिम येथे विकास ठाकरे हे उमेदवार आहेत. गोंदिया येथे गोपालदास शंकरलाल अग्रवाल, राजुरा मतदारसंघात सुभाष धोटे, भोर येथे संग्राम थोपटे, अक्कलकोट येथे सिद्धराम म्हेत्रे, शिर्डी येथे प्रभावती घोगरे, अक्कलकुवा - अॅड. के. सी. पाडवी, शहादा - राजेंद्रकुमार कृष्णराव गावित, नंदूरबार - किरण दामोदर तडवी, नवापूर - श्रीकृष्णकुमार सुरुपसिंह नाईक, साकरी - प्रवीण बापू चौरे, धामणगाव रेल्वे - प्रो. विरेंद्र वाल्मिकराव जगताप, अचलपूर - अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ सुभानराव देशमुख उमेदवार आहेत. चिमूर येथे सतीश वारजूकर, हदगावमध्ये माधवराव निवृत्ती पवार पाटील, भोकर येथे तिरुपी बाबूराव कदम, नायगाव येथे मिनल निरंजन पाटील उमेदवार आहेत. पाथरी- सुरेश वरपुडकर, फुलंब्री –विलास केशवराव औताडे, मीरा भायंदर- सय्यद मुझफ्फर हुसैन, मालाड पश्चिम येथे अस्लम शेख, चांदीवली येथे मोहम्मद आरिफ नसीम खान, धारावी येथे डॉ. ज्योती गायकवाड, मुंबाइदेली येथे अमिन अमिराली पटेल, तर पुरंदर येथे संजय जगताप उमेदवार आहेत