Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कार्यकर्त्यांच्या अंगाला हात लावून तर बघा, राजेश क्षीरसागर हा षंढ नाही ! सतेज पाटलांना चॅलेंजकागल, करवीर, राधानगरीत चुरशीने मतदान ! जिल्ह्यात सायंकाळ सहानंतरही २०० केंद्रावर मतदारांच्या रांगा !!कसबा बावडा, सदरबझारमध्ये कार्यकर्ते आमनेसामने, घोषणाबाजीने तणावाची स्थिती नेते-उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क ! मतदारांत उत्साह, सकाळी ९ पर्यंत ७.३८ मतदान !!दाक्षिणत्या सिनेमाला साजेसा अॅक्शनपट मराठीत, रानटी चित्रपट २२ नोव्हेंबरपासून प्रदर्शितजिल्ह्यातील ३३ लाख मतदारासाठी मतदान केंद्रे सज्ज, शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावावा -जिल्हाधिकारी अमोल येडगेजैन कल्याणक सर्किटसाठी ललित गांधींना लखनौ भेटीचे निमंत्रणगोकुळच्या कार्यक्रमात उलगडले आनंदी तणावमुक्त जीवनचे रहस्यअभियांत्रिकीच्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानप्रेमी बनवावे -निखिल पडतेसर्व घटकांच्या भरघोस पाठिंब्यामुळे अमल महाडिक हेच विजयाचा गुलाल उधाळणार -शौमिका महाडिक

जाहिरात

 

केपींच्यामुळे मतदारसंघ दहा वर्षे पाठीमागे गेला, आबिटकरांना निवडून द्या - अरुण डोंगळे

schedule08 Nov 24 person by visibility 47 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आमदारकीच्या दहा वर्षाच्या कालावधीत माजी आमदार के.पी.पाटील राधानगरी मतदार संघाला न्याय देऊ शकले नाहीत. यामुळे मतदार संघ दहा वर्ष पाठीमागे गेला. याउलट आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारांनी दिलेल्या संधीचे सोने केलं आहे. त्यामुळे या निवडणूकीत आमदार प्रकाश आबिटकर यांचा विजय निश्चित असून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांनी व्यक्त केला.  तुरंबे  येथे महायुतीचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. डोंगळे म्हणाले, निवडणुकीत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. मतदार संघाचा विकास करणाऱ्या माणसाला साथ देऊया. निवडणूकीत उच्चांकी मतांनी आमदार आबिटकर निवडून देऊन मतदार संघाचे अपुर्ण राहिलेले मंत्री पदाचे स्वप्न साकार करूया यामध्ये राधानगरीकरांचा मोठा वाटा असेल अशी ग्वाही दिली.                        जालिंदर पाटील म्हणाले की, आपल्याला सतत मार्गदर्शन करणारे जाधव गुरूजी काळाच्या पडद्याआड गेले आणि दुसरे गुरूजी आपल्या सोबत आलेत त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. मी आणि माझा मुलगा या राजकारणाला विरोध करण्याचे सामर्थ्य आमदार आबिटकर यांनी दाखविलेले आहे. प्रस्थापितांनी उभे केलेले चक्रव्युव्ह भेदून आमदार  आबिटकर मोठ्या मताधिक्यानी विजयी करून राधानगरीची जनता पुन्हा वाजत-गाजत विधानसभेत पाठविणार असल्याचे सांगितले.

आजरा जि.प.मतदार संघातून मताधिक्य देणार – अशोक चराटी                 मंत्री चंद्रकांत पाटील व आमदार प्रकाश आबिटकरांच्या प्रयत्नामुळे  आजरा शहराला नगरपंचायत मंजूर झाली. आजरा शहराच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याचबरोबर आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील वाड्या-वस्त्यांच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. एकीकडे मतदार संघाच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे आमदार आबिटकर तर याउलट दुसरीकडे माजी आमदार के.पी.पाटील मतदार संघात फिरकतच नव्हते असे चित्र होते. त्यामुळे आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील जनता आमदार यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे.राधानगरी तालुका गवई गटाचे उपाध्यक्ष सातापा कांबळे, तालुका संघटक रविंद्र कांबळे, जिल्हा संघटक विलास कांबळे, विश्वास कांबळे-दुर्गमानवाड, यशवंत कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व सरवडे येथील अरुण साठे गटाने जाहीर पाठींबा दिला.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes