मिशन ५० हजार घरकुलासाठी जिप प्रयत्नशील - प्रभारी प्रकल्प संचालक संतोष जोशी
schedule22 Nov 25 person by visibility 5 categoryक्रीडाजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मिशन पन्नास हजार घरकुल मोहीम आखली आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविली जात असून या मोहिमेंतर्गत घरकुलांचे बांधकाम डिसेंबर २०२५ अखेर पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू आहेत अशी माहिती प्रभारी प्रकल्प संचालक व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी सांगितले.
मिशन पन्नास हजार अतंर्गत घरकुले पूर्ण करणेबाबत सर्व गटविकास अधिकारी यांचा दर मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्याकडून आढावा घेतला जातो. घरकुल शुभारंभ मोहिमेमध्ये सुरु नसलेल्या घरकुलापैकी मोहिमेमध्ये १०५०० घरकुलांचे बांधकाम सुरु झाले आहे. प्रभारी प्रकल्प संचालक संतोष जोशी यांनी तालुका स्तरावर सर्व पंचायत समितीस भेटी देऊन ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत अधिकारी, गट विकास अधिकारी, पालक अधिकारी व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचा मिशन 50 हजार घरकुलाबाबत आढावा घेतला आहे. तसेच सर्व घरे ३१ डिसेंबर २०२५ अखेर पूर्ण करण्याविषयी सूचना केल्या आहेत. २०२४ – २५ व २०२५ – २६ या काळात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन ग्रामीण अंतर्गत ५३ हजार ८३६ घरकुले मंजूर आहेत. मंजूर घरकुलांपैकी ३० हजार ८८१ घरकुलांचे बांधकाम सुरू आहे.