Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
तण तथनगरसेविका, महिला अधिकारी क्रिकेटच्या मैदानावर! शिक्षिकेनही लुटला खेळाचा आनंद ! !महापालिकेतील रिक्त जागांच्या भरतीप्रश्नी काँग्रेस आक्रमक, गुरुवारपासून साखळी उपोषणशहर स्वच्छतेसाठी कोल्हापूर फर्स्टचे पाऊल, महापालिकेला दिल्या चार स्विपिंग मशिन्सस्त्रियाला प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिक भागीदारी मिळणे आवश्यक : डॉ. मीना शेंडकरकॉमर्स कॉलेजच्या तीस विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांकडून विकासशुल्क- शैक्षणिक फी आगाऊ वसूल केल्यास कॉलेजवर कारवाईकोल्हापूर फर्स्टचा सोमवारी वर्धापनदिन, महापालिकेस करणार स्विपींग मशिन प्रदानगोकुळमध्ये महिला दिनानिमित्त विविध उपक्रम वूमेन इन लीडरशिप कार्यक्रमात उलगडली स्त्रीशक्तीची कर्तबगारी

जाहिरात

 

गायक शिक्षक मंचचा सोमवारी सातवा वर्धापनदिन, नाईन्टीज मेलडी संगीत मैफिल 

schedule22 Nov 25 person by visibility 262 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  :  गायक शिक्षक मंचच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त सोमवरी, २४ नोव्हेंबर २०२५ रोजी गायन समाज देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिर येथे नाईन्टींज मेलडी संगीत मैफल आयोजित केले आहे. या कार्यक्रमात नव्वदीच्या दशकातील सदाबहार गीतांची नाईन्टीज मेलडी संगीत मैफिल आहे. सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गायक शिक्षक मंचचे समन्यवक राजेंद्र कोरे व बाळ डेळेकर यांनी केले आहे.     
 शिक्षण क्षेत्रातील अधिकारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हक्काचं व्यासपीठ असलेल्या गायक शिक्षक मंचाचा सातवा वर्धापनदिन  होत आहे. गेल्या सात वर्षापासून मिले सूर मेरा तुम्हारा, चित्रहार, आर. डी बर्मन स्पेशल, द म्युझिकल ट्रिब्यूट टू ऋषी कपूर अँड मोहम्मद अजीज, मंगल गाणी दंगल गाणी अशा एकापेक्षा एक मराठी हिंदी गीतांच्या संगीतमय मैफिलींचे सादरीकरण मंचाच्या अधिकारी व शिक्षक सदस्यांनी सादर केले आहे. वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नव्वदीच्या दशकातील कुमार सानू, उदित्त नारायण, एसपी.बालसुब्रमण्यम, हरीहरन,सोनू निगम, महम्मद अजीज,सुरेश वाडकर,लता मंगेशकर, आशा भोसले, अलका याज्ञिक, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमुर्ती, साधना सरगम  यांच्यासह विविध गायकांनी अजरामर केलेल्या गीताचे सादरीकरण करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes