Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानावर आंतरविभागीय बास्केटबॉल स्पर्धा, बारा संघांचा सहभागबालिंगा जल उपसा केंद्राचा सोमवारी पाणीपुरवठा बंद, महापालिकेतर्फे टँकरची सोयकोल्हापूर जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी ५६! नगरसेवकपदासाठी ८०९ उमेदवार रिंगणात ! !गायक शिक्षक मंचचा सोमवारी सातवा वर्धापनदिन, नाईन्टीज मेलडी संगीत मैफिल संशोधनाचे पेटंट घेऊन व्यावसायीकरण करणे महत्त्वाचे : डॉ. डी. टी. शिर्केआयुक्तांनी केली रस्ते कामाची पाहणी, अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना सक्त सूचनापूरग्रस्तांना मदत, विवेकानंद कॉलेजचा पुण्यात सन्मान ! उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून गौरव!!रिंगरोडला महापालिकेतर्फे हॉस्पिटल, झूम प्रकल्प येथे सीएनजी गॅस प्रकल्प ! अमल महाडिकांची अधिकाऱ्यांसोबत चर्चाजिल्ह्यात तीस हजाराहून अधिक घरकुलांचे काम सुरू ! डिसेंबर अखेर ५० हजार घरकुलासाठी मोहिम ! !आठ महिने उलटले, सिनेट सभा नाही ! नियमांचे उल्लंघन,  प्रशासनाची चालढकल ! !

जाहिरात

 

शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानावर आंतरविभागीय बास्केटबॉल स्पर्धा, बारा संघांचा सहभाग

schedule22 Nov 25 person by visibility 26 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ क्रीडा अधिविभागाच्या वतीने शहाजी लॉ कॉलेज येथे शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय बास्केटबॉल पुरुष स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत संलग्न महाविद्यालयातील एकूण बारा संघ पात्र ठरले आहेत. दरम्यान शनिवारी झालेल्या सामन्यांमधून न्यू कॉलेज कोल्हापूर, नाईट कॉलेज कोल्हापूर, मिरज महाविद्यालय मिरज आणि विजयसिंह यादव महाविद्यालय पेठवाडगाव यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. या स्पर्धेमधून पुढील महिन्यात नांदेड येथे होणाऱ्या क्रीडा महोत्सव २०२५ आणि पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठाचा संघ निवडला जाणार आहे. दरम्यान कौन्सिल ऑफ एज्युकेशन सचिव विश्वनाथ मगदूम यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी देशभक्त रत्नाप्पण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या डॉ वर्षा मैंदर्गी, शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील, बास्केटबॉल पुरुष निवड समितीचे चेअरमन डॉ नंदकुमार पाटील, सदस्य डॉ आकाश बनसोडे, डॉ समीर पवार, स्पर्धा निरीक्षक डॉ सुरेश फराकटे, डॉ संजय पाटील, आदी उपस्थित होते. प्रा. किरण पाटील, प्रा. सुचय खोपडे, केदार सुतार , अमित दलाल, सुनील देसाई, आमिर मुल्ला, सूरज वाघेला , अजित तिवडे यांनी संयोजन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes