
चेअरमन विश्वास पाटील यांची माहिती
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने शुक्रवारी (ता. सात ऑक्टोबर) सव्वा लाख रुपये बक्षिसांची गोकुळ झिम्मा-फुगडी स्पर्धा आयोजित केली आहे. अशी माहिती गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली आहे. या स्पर्धेमध्ये झिम्मा, फुगडी, घागर घुमवणे, छुई –फुई महिलांच्या पारंपारिक खेळांचा समावेश आहे.
गोकुळने महिला सबलीकरणाचे काम आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत चांगल्याप्रकारे केलेले आहे.महिलांचे बचत गट तयार करून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गोकुळने नेहमीच प्रयत्नशील आहे. मराठमोळ्या संस्कृतीची परंपरा जोपासताना महिलांच्या पारंपारिक खेळांना संधी प्राप्त करून देण्यासाठी गोकुळ प्रत्येक वर्षी या स्पर्धेचे आयोजन करत आहे.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता ताराबाई पार्क, येथील गोकुळच्या कार्यालयाच्या आवारात स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण माजी ग्रामविकासमंत्री आमदार हसन मुश्रीफ, माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील,आघाडीचे प्रमुख नेते व संचालक मंडळ यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती संघाचे चेअरमन पाटील यांनी दिली.
या स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळशी सलग्न दूध संस्थाच्या दूध उत्पादक महिलांकरिता आयोजित केलेल्या असून गोकुळमार्फत विजेत्या संघांना रोख रक्कमेसह स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे.