+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustभारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना गोकुळमार्फत अभिवादन adjustसंयमाला मर्यादा,२४ तासात हल्ले थांबवा ! नाही तर मी बेळगावमध्ये जाणार !! adjustबेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड, सीमावाद चिघळला adjustराजेश क्षीरसागर फौंडेशनतर्फे सौंदतीत भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा-अल्पोपहार वाटप. adjustकोल्हापुरात जानेवारीत निमंत्रितांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धा adjustडॉ. जयसिंगराव पवार यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्कार प्रदान adjustपॅरा ओपन टेबल टेनिस स्पर्धेत विवेक मोरे तृतीय adjustशाहू गोल्ड कप, फुटबॉल अॅकॅडमीची मालोजीराजेंकडून घोषणा adjustमालोजीराजे, मधुरिमाराजे यांच्या हस्ते केएसए लोगोचे अनावरण adjustशिक्षक बदलीसाठी संदर्भ दिनांक ३० जून २०२३ गृहीत धरावा ! पुरोगामी शिक्षक संघटनेच्या राज्य सभेत ठराव !!
Maharashtra-News-1IMG-20200920-WA0002
schedule03 Oct 22 person by visibility 115 categoryसामाजिक
सभासदांच्या पाल्यांचा बक्षीस देउन गौरव, सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीतर्फे सभासदांसाठी
कोअर बँकिंग प्रणाली व मोबाईल अॅप सुविधेचे उदघाटन झाले. याप्रसंगी सोसायटीतर्फे सभासदांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य मधुकर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इयत्ता इयत्ता दहावी व बारावीच्या यंदाच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण प्राप्त व इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय तसेच कला क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या मुला-मुलींचा बक्षीस देउन गौरव झाला. तसेच सेवानिवृत्त
सभासदांचा सत्कार झाला.
 “ २१ व्या शतकातील पिढी अत्यंत सक्षम असून त्यांनी योग्य मार्गदर्शनाखाली प्रयत्न केलेस यश मिळेल. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची गेल्या १३ वर्षातील भरारी कौतुकास्पद आहे.’असे उद्गार प्रकल्प संचालक मोरे यांनी काढले.
सोसायटीचे चेअरमन राजीव परीट यांनी प्रास्ताविकात मोबाईल अॅप सुविधेमुळे सभासदांना संस्थेकडील आपले सर्व
व्यवहार ऑनलाईन पाहता येणार आहेत.तसेच सभासदांना इतर कोणत्याही बँकेशी व्यवहार करता येणार असल्याचे सांगितले. व्हाइस चेअरमन दिनकर तराळ यांनी स्वागत केले.  कार्यक्रमाला महावीर सोळांकुरे, विजय टिपुगडे, शिवाजी काळे, रामदास पाटील, शांताराम माने सचिन मगर, श्रीकांत वरुटे, बजरंग कांबळे, विष्णू तळेकर, रविंद्र घस्ते, रंजना आडके, संगीता गुजर, एन. डी. पाटील, रणजीत पाटील, सुनिल मिसाळ, नासिर नाईक, तज्ज्ञ संचालक सयाजी पाटील, विजय गवंडी, सुकाणू समिती निमंत्रक एम. एम. पाटील, मार्गदशक ए. व्ही. कांबळे सदस्य के. आर. किरुळकर, राजाराम वरुटे, प्रकाश देसाई, शिवाजी कोळी, भालचंद्र माने, लालासो मोहीते, प्रकाश पाटील, एम. आर. पाटील, मॅनेजर व्ही. एन. बोरगे आदी उपस्थित होते.
……..