आरोग्य-नेत्ररोग तपासणीसाठी तरुण मंडळांनी संपर्क साधावा
schedule17 Sep 22 person by visibility 604 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
नवरात्र उत्सव आणि दसरा दिवाळी दरम्यान सार्वजनिक तरुण मंडळांनी ज्या त्या भागातील नागरिकांच्या आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यासाठी श्री पंत वालावलकर हॉस्पिटलशी संपर्क साधावा असे आवाहन हॉस्पिटलचे प्रमुख संचालक संतोष कुलकर्णी यांनी केले आहे.
या शिबिरामधून डोळे तपासणीसह चष्माचा नंबरही काढून दिला जाणार आहे. गरज पडल्यास मोतीबिंदू अथवा ऑपरेशन सवलतीत करण्यात येईल. आरोग्य तपासणीमध्ये तीन ते दहा दिवसाची औषधे नागरिकांना देण्यात येणार आहेत. तरी इच्छुक तरुण मंडळे, बचत गट, तालीम संस्थांनी संस्थेच्या लेटरहेडवर शिबिर आयोजनासंबंधी संपर्क साधावा. समन्वयक विरेंद्र वणकुद्रे व राजेंद्र मकोटे (९५२७४३४३००/९७६२८०९७६२)यांच्याशी संपर्क करावा. शिवाय ईएसआयसी संबंधित रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार कण्यात येतात.
……………….