योग आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली - शितल भगत
schedule21 Jun 25 person by visibility 429 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : येथील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित,न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक योग दिन उत्साहात झाला. आर्ट ऑफ लिव्हिंग व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य. डॉ. रविंद्र कुंभार यांनी योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या व योग त्यांचे दैनंदिन आयुष्यातील महत्त्व यांविषयी मार्गदर्शन केले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योगशिक्षक शितल भगत यांनी योगाअभ्यासाचे महत्व,त्यांचे शरीरावर आणि मनावर होणारे सकारात्मक परिणाम त्यांचे महत्त्व सांगितले. यावर्षी जागतिक योग दिनाचे अकरावे वर्ष होते.आणि ' एक पृथ्वी एक आरोग्य ' ही संकल्पना होती.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. निकिता शेटे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अनघा चोपडे, महाविद्यालयाच्या प्रा.पियुषा नेजदार, प्रा.रुचा अष्टेकर उपस्थित होते .पूजाश्री पाटील यांनी सूत्रसंचालनकेले.