गोकुळमध्ये योगदिन उत्साहात साजरा, प्रात्यक्षिके सादर
schedule21 Jun 24 person by visibility 346 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे, शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयात ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योगदिन साजरा झाला. योगशिक्षक संजय पोवार यांनी योगाचे महत्व पटवून दिले.
संघाचे संचालक विश्वास पाटील म्हणाले, ‘ दैनंदिन कामाच्या धावपळीत माणसाला उसंत मिळत नाही. सध्याच्या धावपळीच्या जगात निरोगी शरीर व आनंदी मनासाठी योग हा एकमेव उपाय आहे. यामुळे नित्य नियमाने योगासने करावीत.”
यावेळी योगासनांची प्रात्यक्षिके झाली. सर्वांगासन,पादान्गुष्टासन, शशिकासन, मंडूकासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, विपरीत नौकासन, पर्वतासन, ताडासन ही आसने पाटील यांनी कर्मचा-यांसमोर सादर केलीं. तसेच कर्मचा-यांकडून करवून घेतली.
योगमित्रचे शिक्षक संजय पोवार व विशाल गुडूळकर यांनी योगाविषयी माहिती दिली. डॉ.एम.पी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी संचालक संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बाळासाहेब खाडे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, सहा.महाव्यवस्थापक मार्केटिंग जगदीश पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, संगणक सहा.व्यवस्थापक व्ही.व्ही.जोशी, खरेदी व्यवस्थापक के. एन. मोळक, अभियांत्रिकी व्यवस्थापक प्रताप पडवळ, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. पी. जे. साळुंखे, डॉ. प्रकाश दळवी, संकलन सहायक व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, बी.आर.पाटील, पशुखाद्य व्यवस्थापक डॉ.व्ही.डी.पाटील, बी.एस.मुडकशिवाले उपस्थित होते.