Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
टीईटी विरोधातील मोर्चात जिल्ह्यातील शंभर  टक्के शिक्षक सहभागी होणार- आमदार जयंत आसगांवकरकोल्हापूर शहरातील रस्ते दर्जेदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : आमदार राजेश क्षीरसागरकोरे अभियांत्रिकीत इंडस्ट्री रेडी इंजिनिअर प्रोग्रामकौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू - प्रचारप्रमुख श्रीराम साळुंखेलवकरच आचारसंहिता, पहिल्यांदा नगरपालिका, मग जिल्हा परिषदेच्या निवडणुका –हसन मुश्रीफांचा अंदाजकेडीसीसीचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील, नेसरीच्या सरपंच गिरीजा शिंदे यांचा भाजपात प्रवेशअंतरंग हॉस्पिटलचा अपोलो हॉस्पिटल्सशी करार, कोल्हापूरच्या  मेडिकल टुरिझमला गती - डॉ .विवेकानंद कुलकणीक्रिप्टोग्राफी तंत्रज्ञान भविष्यात सर्वव्यापी होणार-विवेकानंदतर्फे आयोजित चर्चासत्रात उमटला सूरन्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बुधवारी रोजगार मेळावाअधिकाऱ्यांची नकारात्मकता अन् संतप्त पालकमंत्री ! आबिटकरांनी बैठकीतच दिले शहर अभियंत्यांच्या पदमुक्तीचे आदेश !!

जाहिरात

 

रोजगार हमी योजनेतून जतवासियांना लखपती करण्यासाठी प्रभावीपणे कामे करा-मंत्री भरत गोगावले

schedule13 Feb 25 person by visibility 549 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून अधिकाधिक प्रकल्प राबवू. जतला सुजलाम सुफलाम करण्यासाठी व जतवासियांना लखपती करण्यासाठी अधिकारी व नागरिकांनी रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे प्रभावीपणे राबवावीत. त्यासाठी वेगवेगळ्या खात्याअंतर्गत अधिकाधिक आवश्यक निधी देऊ. तसेच जागतिक बँकेकडून भविष्यात मित्रा संस्थेला मिळणाऱ्या निधीतील अधिकाधिक निधी जतच्या विकासासाठी देणार असल्याची ग्वाही रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले यांनी दिली.

जत येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) सहाय्याने हरित महाराष्ट्र व सुविधा संपन्न कुटुंब कार्यक्रमाची अंमलबजावणी व याकरिता करावयाच्या उपाययोजना याबाबत सरपंच मेळाव्याचे आयोजन केले होते.  तहसील कार्यालय प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, मिशन मनरेगाचे महासंचालक श्री. नंदकुमार, जिल्हाधिकारी अशोक काकडे, उपवनसंरक्षक नीता कट्टे, मनरेगाचे राज्य गुण नियंत्रक राजेंद्र शहाडे, उपजिल्हाधिकारी (दीपक शिंदे, ग्रामपंचायत विभागाचे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे आदि उपस्थित होते. 

आमदार गोपिचंद पडळकर म्हणाले, ‘दुष्काळी जिल्ह्यांच्या विकासासाठी राज्य शासनाने जलसंधारण कामांसाठी भरीव निधी दिला आहे. जत तालुक्यात गट तट बाजूला ठेवून रोजगार हमी योजनेची कामे यशस्वी करा. तालुक्यातील प्रत्येक माणूस रोजगार हमी योजनेतून लखपती व्हावा. अधिकाऱ्यांनीही त्यासाठी सहकार्य करून  योजना यशस्वी करावी.’ गटविकास अधिकारी आनंदा लोकरे यांनी प्रास्ताविक केले. वैष्णवी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी तालुक्यातील विकासात्मक कामाबाबत चित्रफीत दाखवण्यात आली.  प्राणवायू रथाचे उद्घाटन झाले. या बसमध्ये बांबू लागवड वस्तू व स्क्रीन आहे. त्यातून बांबू लागवडीची माहिती दिली जाणार आहे. सरपंच संघटना व रोजगार सेवक संघटनेच्या माध्यमातून मंत्री भरत गोगावले यांचा सत्कार करण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes