यशस्वी मंचतर्फे महिलांचा सन्मान
schedule14 Mar 24 person by visibility 515 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
यशस्वी मंचातर्फे,जागतिक महिला दिनानिमित्त, यशस्वी सन्मान २०२४ पुरस्कार सोहळा झाला. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पंचवीस महिलांना यशस्वी सन्मान पुरस्कार भागीरथी महिला संस्थेच्या अरुंधती महाडिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी महिलांसाठी लकी ड्रॉ आणि करमणुकीेचे कार्यक्रम झाले. महिलांनी घर संसार सांभाळून आपल्यातील कलागुणांना वाव देणे, त्याचा उपयोग आपल्या समाजासाठी आणि प्रथमता आपल्या कुटुंबासाठी करावे. यामधूनच स्वतःच अस्तित्व निर्माण करू शकतो.असे प्रतिपादन अ महाडिक यांनी केलं.तसेच यशस्वी मंचाच्या कार्याबद्दल विशेष कौतुक ही केलं.यावेळी यशस्वी मंचाचे संस्थापिका स्वप्नाली जगोजे ,मोहिनी वनकुंद्रे , मंजिरी कपडेकर,वैशाली काशीद उपस्थित होत्या.