Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
इंधन बचत हीच राष्ट्रसेवा…शिक्षण समिती सभापती, शिक्षणाधिकाऱ्यांचा बसमधून प्रवासशिवाजी विद्यापीठाचे नवीन कुलगुरु कोण ? कुलपती कार्यालयाकडे नजरा राज्यातील पंचवीस बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ! सुनील फुलारींची ठाण्यात बदली, रंजन शर्मा कोल्हापूरचे नवे आयजी!!ङङ थथथऋतूपूर्ण - प्रियांका कांबळे विवाह सोहळा थाटातसन्मान वारशाचा - पुनर्भेट नात्यांची ! केआयटीच्या प्रगतीसाठी दिल्लीत एकवटले माजी विद्यार्थी !!इंधन बचतीचा फंडा…जिप अध्यक्षांचा प्रवास बसमधून, उपाध्यक्ष - सभापती ई बाईकवरुन ! अधिकारी सायकलवर!!नोटिसा काढून अतिक्रमणधारकांना संरक्षण - माजी नगरसेवक संघटनेचा आरोपजिल्हा परिषदेत छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरीवंचित मुलांना मॉलची सफर, सरकत्या जिन्याचा आनंद, सिनेमाच्या दुनियेची सैर अन् मनोरंजनाची मेजवाणी

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाचे नवीन कुलगुरु कोण ? कुलपती कार्यालयाकडे नजरा

schedule15 May 26 person by visibility 63 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे नवीन कुलगुरू कोण असणार? याची चर्चा सध्या उच्च शिक्षण क्षेत्रात सुरू आहे. राज्यभवन येथे गुरुवारी, १४ मे २०२६ रोजी मुलाखती झाल्या. कुलगुरुपदासाठी शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू पी. एस. पाटील, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव, नागपूर विद्यापीठातील डॉ. स्मिता देशमुख आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाती पदार्थविज्ञान विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. संजय ढोले यांच्या मुलाखती झाल्या.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरुपद गेली नऊ महिने  रिक्त आहे. तत्कालिन कुलगुरू डी. टी. शिर्के यांचा कुलगुरुपदाचा कालावधी सहा ऑक्टोबर २०२५ रोजी संपला. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी यांच्याकडे सोपविला होता. कुलगुरू शोध निवड समितीतर्फे कुलगुरुपदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. २३ डिसेंबर २०२५ ते २७ जानेवारी २०२६ या अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत ११५ जणांनी अर्ज दाखल केले. फेब्रुवारी महिन्यात त्या अर्जांची छाननी झाली. त्यातून समितीने २८ उमेदवारांची नावे मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केली आहेत. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती तीन व चार एप्रिल २०२६ रोजी झाल्या होत्या. कुलपती कार्यालयाकडून कुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखतीसाठी ११ मे रोजी पाच जणांना कळविले होते. त्यानुसार १४ मे सकाळी ११ वाजल्यापासून मुलाखती झाल्या. एक दिवसाचा कालावधी उलटला तरी अद्याप कुलपती कार्यालयाकडून नवीन कुलगुरू बाबत घोषणा झाली नाही.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes