ऋतूपूर्ण - प्रियांका कांबळे विवाह सोहळा थाटात
schedule15 May 26 person by visibility 54 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी संचालक सुरेश कांबळे यांचे चिरंजीव व गृहतारण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋतूपूर्ण यांचा विवाह चि.सौ.कां.प्रियांका (चिमण आनंदा कांबळे रा.शिरोली पुलाची यांची सुकन्या) यांच्याशी थाटात झाला. मॅजेस्टिक लॉन सोनतळी केर्ली येथे हा विवाह सोहळा उत्साहात झाला.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवित वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. विधानपरिषदेतींल काँग्रेसचे गटनेते व आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, करवीर पंचायत समितीचे सभापती साताप्पा पाटील, जिल्हा परिषद काँग्रेस पक्षाचे गटनेते एकनाथ पाटील, युवराज बेलेकर, महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आदिल फरास, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे माजी सभापती विशांत महापुरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश पाटील पोर्लेकर, महेश चव्हाण, माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत, नगरसेविका ऋग्वेदा राहुल माने, साबळेवाडी शाहू समूहाचे अध्यक्ष रणजीत पाटील, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती अश्विनी धोत्रे, शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे, गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील,अर्चना पाथरे, विश्वास सुतार, शिवाजी मानकर, वेतन पथक अधीक्षक उदय सरनाईक, माजी उपशिक्षणाधिकारी एस.के. यादव, आर. डी. पाटील, शिक्षक बँकेचे अध्यक्ष एस.व्ही. पाटील, संचालिका वर्षा केनवडे, गौतम वर्धन, शिक्षक नेते राजाराम वरूटे, प्रसाद पाटील, मोहन भोसले, रविकुमार पाटील, खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष भरत रसाळे, शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन. वाय. पाटील, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बबन केकरे, बजरंग लगारे, विलास चौगुले, राजमोहन पाटील, दिलीप बच्चे, पी.के. पाटील,पांडुरंग केणे, रवी नागटिळे, बी. एस. पाटील, संजय कुर्डूकर, सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील शिंगणापूर, युवराज गवळी, डॉ.उदय पाटील, प्रताप रबाडे संतोष गायकवाड, दीपाली भोईटे, गणपती मांडवकर,स्वेता खांडेकर, सदानंद शिंदे, जयवंत पाटील , प्रभाकर कमळकर उपस्थित होते उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्थेचे अध्यक्ष सुरेश कांबळे, बिंदिया कांबळे ,संस्थेचे संचालक कपिल पोवार ,जहागीर मुलाणी, पांडुरंग पाटील, गुंगा पाटील, एम.एस.चव्हाण, के. वाय. कुंभार, राजेंद्र पाटील, डी.डी.पाटील , विष्णू खोत, राजाराम जाधव, शिवतेज बाजरी, अमोल चव्हाण ,सीमा पाटील, स्वाती कुंभार, बी.डी. जाधव, तानाजी धारपोवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.