Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिप कर्मचारी सहकारी सोसायटीतर्फे सभासदांच्या पाल्यासाठी अभ्यासिकाकोरे अभियांत्रिकीत ‘मल्टी-बिझनेस मॉडेल इनोव्हेशन’वर मार्गदर्शनप्राचार्य डॉ. धनाजी कणसे यांना आदर्श राज्य प्राचार्य पुरस्कारजज ढढसंवाद  औपचारिकतेपलीकडचा : विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पांचा! कुलगुरुंच्या निवासस्थानची हृदय भेट ! !आरोग्य विभागात अधिकाऱ्यांचे दरवर्षी गुणांकन, तीन वर्षांच्या रिपोर्ट कार्डवर श्रेणी निश्चितीमाणूसपणाला बंदिस्त करणाऱ्या चौकटी मोडून टाकण्याची जबाबदारी शिक्षकांची : हिंदुराव हुजरे-पाटीलकोजिमाशितर्फे कर्जमर्यादा ६२ लाखापर्यंत ! २४ टक्के लाभांश, मंगळवारपासून खात्यावर जमा ! !  शिक्षकांचे आंदोलन, निवेदन स्वीकारायला वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित ! आमदारांनी केला जिल्हा प्रशासनाला निषेध !!आठ थर अन् ट्रिपल एक्क्याची कमाल…शिवनेरी गोविंदा पथकाने फोडली युवाशक्तीची तीन लाखाची दहीहंडी

जाहिरात

 

जिप कर्मचारी सहकारी सोसायटीतर्फे सभासदांच्या पाल्यासाठी अभ्यासिका

schedule07 Sep 26 person by visibility 20 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. सोसायटीच्या हिरकमहोत्सवानिमित्त सभासदांच्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या दोन्हीचा उद्घाटन समारंभ मंगळवारी, आठ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित केला आहे. अशी माहिती चेअरमन संजय शिंदे व  व्हाइस चेअरमन जयकुमार रेळेकर  यांनी दिली. दुपारी १२.३० वाजता सोसायटीच्या मुख्य कार्यालयात कार्यक्रम होणार आहे. सोसायटीतर्फे संस्थेच्या सभासदांच्या मुला, मुलींना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुस्तके दिली जातात. त्याचा लाभ घेत सभासदांची ५० पेक्षा जास्त मुले सरकारी सेवेत वर्ग एक व वर्ग दोन यापदावर कार्यरत आहेत. आता हिरक महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांच्या मुलांसाठी अभ्यासिका तयार केली आहे. अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेसंदर्भातील पुस्तके असणार आहेत.सभासदाच्या मुलांनी लाभ घ्यावा असे आवाहन सोसायटीने केले आहे.

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes