Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांना डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्रदानशाळा वाचवा-  शिक्षण वाचवासाठी पाच ऑक्टोबरला मुंबईत धरणे आंदोलनकोल्हापुरात तीन दिवसीय “ग्लोरियस"  वैद्यकीय परिषदजिप कर्मचारी सहकारी सोसायटीतर्फे सभासदांच्या पाल्यासाठी अभ्यासिकाकोरे अभियांत्रिकीत ‘मल्टी-बिझनेस मॉडेल इनोव्हेशन’वर मार्गदर्शनप्राचार्य डॉ. धनाजी कणसे यांना आदर्श राज्य प्राचार्य पुरस्कारनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या –डॉ. राकेश कुमार शर्मासंवाद  औपचारिकतेपलीकडचा : विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पांचा! कुलगुरुंच्या निवासस्थानची हृदय भेट ! !आरोग्य विभागात अधिकाऱ्यांचे दरवर्षी गुणांकन, तीन वर्षांच्या रिपोर्ट कार्डवर श्रेणी निश्चितीमाणूसपणाला बंदिस्त करणाऱ्या चौकटी मोडून टाकण्याची जबाबदारी शिक्षकांची : हिंदुराव हुजरे-पाटील

जाहिरात

 

प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांना डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्रदान

schedule07 Sep 26 person by visibility 8 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : सांगरूळ शिक्षण संस्थेच्या स. ब. खाडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांना राज्य सरकारचा डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मान चिह्न, प्रमाणपत्र, शाॅल व 25 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप होते. शिक्षक दिनाचे औचित्य साधून  उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात पुरस्कार वितरण समारोह शनिवारी उत्साहात पार पडला. डॉ. कुंभार यांना उच्च शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानासाठी प्राचार्य गटातून २०२६ चा पुरस्कार जाहीर झाला होता. डॉ. कुंभार यांना सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष य. ल. खाडे, सचिव आमदार प्रा. जयंत आसगावकर, उपाध्यक्ष के. ना. जाधव, सहसचिव डी. एन. कुलकर्णी, खजाननीस डी. जी. खाडे यांनी अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes