जिल्हा परिषदेच्या शाळेत पिंक रुम, राज्यातील पहिला प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात
schedule01 Jan 26 person by visibility 59 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ७७० शाळांमध्ये पिंक रूम तयार केल्या आहेत. किशोरवयीन मुलींचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी राबवलेला राज्यातील पहिला प्रकल्प आहे. परदेशातील व्हाईट रूमच्या धर्तीवर कोल्हापूर जिल्हा परिषदेने शाळांमध्ये पिंक रुम संकल्पना राबविली आहे. किशोरवयीन मुलींसाठी शाळा परिसरात या निमित्ताने एक सुरक्षित जागा उपलब्ध होणार आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस व प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पिंक रुममध्ये मुलींना बसण्यासाठी खुर्ची, टेबल, आरसा, पिण्याचे पाणी, सॅनिटरी नॅपकिन, डिस्पोजल मशीन, शिवाय त्या खोलीमध्ये हवा आणि सूर्यप्रकाश खेळता राहावा या अनुषंगाने रचना केली आहे. सहावीच्या पुढील वर्ग असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ८३३ शाळा आहेत. यापैकी ७७० शाळांमध्ये पिंक रूम तयार झाल्या आहेत. लोकसहभाग, माजी विद्यार्थी संघ आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पिंक रुम साकारल्या. करवीर तालुक्यातील पिरवाडी येथे रूमसाठी स्वतंत्र इमारत बांधली आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि आत्मविश्वासानं मुलींना शिक्षण यासाठी पिंक रूम उपयुक्त ठरतील. दरम्यान जागा उपलब्ध नसलेल्या ६३ शाळांसाठी पर्यायी मार्ग शोधला जात आहे
कोल्हापूर जिल्हा परिषदेने शैक्षणिक गुणवत्तेवर भर दिला आहे. तसेच शाळांमध्ये भौतिक सुविधा, शाळांची दुरुस्ती, समृद्ध शाळा अभियान, किशोरवयीन मुलींशी संवाद असे विविध उपक्रम हाती घेतली आहेत. किशोरवयीन मुलींना वयात येताना त्यांच्या शालेय सामाजिक जीवनात शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांची प्रक्रिया सुरू होते. हे ओळखून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पिंक रुम संकल्पना राबविली