शहीद सीताराम कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये विश्वकर्मा जयंती उत्साहात
schedule18 Sep 25 person by visibility 10 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शहीद सीताराम कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजनाने झाली. “विश्वकर्मा हे केवळ देवशिल्पकार नव्हते, तर त्यांनी मानवाला साधने, तंत्रज्ञान आणि सृजनशीलतेचा वारसा दिला आहे. वास्तुकलेच्या प्रत्येक घटकात त्यांचे योगदान दडलेले आहे.असे मत प्राचार्य हिमांशू चव्हाण यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त एकत्रित संकल्प घेतला की, वास्तुकलेच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी योगदान देऊ. अशी शपथ घेतली. या कार्यक्रमाला प्रा. अभिजीत कांबळे, प्रा. गणेश तुरंबेकर, प्रा. बाबासाहेब कांबळे, विनायक पाटील उपस्थित होते.