Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात भरगच्च कार्यक्रमशाहूवाडी तालुक्यात एमआयडीसाठी हालचाली ! पंधरा दिवसात प्रस्ताव सादर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना !!टोप-संभापूर औद्योगिक वसाहतीत उद्योजकांनी उद्योग उभारणीला प्राधान्य द्या-माजी आमदार जयश्री जाधव प्रभाकरपंत कोरगांवकर हे समाज परिवर्तनाचे माध्यम होते-प्राचार्य ईस्माइल पठाण कसबा बावडा - लाईन बझार परिसरात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई कराडेप्युटी सीईओ ओमप्रकाश यादवांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीरकेडीसीसीच्या संचालकांची लंडन हाऊसला भेट ! हा आयुष्यातील आनंदाचा दिवस -हसन मुश्रीफपी.एस. घाटगे यांचा खासगी शिक्षक महासंघात प्रवेश ! राज्य प्रवक्तापदी निवड !!प्रख्यात अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांचे निधनक्रिडाई कोल्हापूरतर्फे अभियंता दिनी रक्तदान शिबिर

जाहिरात

 

शाहूवाडी तालुक्यात एमआयडीसाठी हालचाली ! पंधरा दिवसात प्रस्ताव सादर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना !!

schedule17 Sep 25 person by visibility 29 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : शाहूवाडी तालुक्यातील औद्योगिक विकासाचा नवा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शाहूवाडीत सुमारे ३५० हेक्टर क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) उभारणी करण्याबाबत आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शाहूवाडी तालुक्यातील अरुळ, आंबर्डे, करंजोशी, सावे, बजागेवाडी व शित्तुर तर्फ मलकापूर या गावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मंत्री सामंत यांनी अधिकाऱ्यांना पुढील पंधरा दिवसांत शाहूवाडी तालुक्यातील उपलब्ध जागेची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.
पन्हाळा तालुक्यातील आवळी येथे एमआयडीसी मंजूर झाली असून, तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांची मागणी पाहता, अरुळ, आंबर्डे, करंजोशी, सावे, बजागेवाडी व शित्तुर तर्फ मलकापूर या पाच गावातील सुमारे ३५० हेक्टर जागा उपलब्ध आहे. सदर जमीन देण्याबाबत ग्रामस्थांनीही सकरात्मकता दर्शवली असल्याचे खासदार धैर्यशील माने आणि आमदार विनय कोरे यांनी
 मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या ठिकाणी आयटी पार्क, चर्म उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योग अशा विविध उद्योगांची निर्मिती होऊ शकते. यामुळे शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीचा मार्ग खुला होईल, असे मत बैठकीत मांडण्यात आले.
हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने व आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडीत एमआयडीसी उभारणीची मागणी केली होती. त्यांनी या भागातील युवकांना रोजगार मिळावा, तसेच येथील नैसर्गिक साधनसामग्रीचा योग्य उपयोग व्हावा, यासाठी औद्योगिक विकासाची गरज असल्याचे स्पष्ट केले.
उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगान, सहाय्यक व्यवस्थापक डॉ. विनय राठोड, डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, किरण जाधव, संतोष भिंगे व उमेश देशमुख , जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील (पेरीडकर) आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes