
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजस्थानी बारा बलुतेदार समाजाचे आदराचे स्थान असलेले श्री. रामदेवबाबा यांचे कोल्हापूर - सांगली रोडवरील शिरोली फाटा येथे मंदिर आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराचा जिर्णोद्धार, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि शोभायात्रा अशा विविध धार्मिक कार्यक्रम २० ते २२ मे २०२३ या कालावधीत होणार आहेत अशी माहिती संयोजक मोहब्बतसिंह देओल, मखनसिंह देवडा, रमेश पुरोहित आणि माजी नगरसेवक ईश्वर परमार यांनी दिली.
श्री रामदेव सेवा समिती मंडळातर्फे धार्मिक उत्सव होणार आहेत. या तीन दिवसात उत्सवादरम्यान कोल्हापूर सांगली जिल्ह्यासह कर्नाटक आणि राजस्थानातील हजारो भाविक उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. रामदेवबाबा महाराज हे राजस्थानमधील होते. उत्तर भारतात त्यांचा भक्तवर्ग मोठा आहे. कोल्हापुरातील शिरोली फाटा येथे त्यांच्या भक्तांनी मंदिर उभारले आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार साेहळा, शोभायात्रा असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत