गोकुळच्या वर्धापनदिनी विविध उपक्रम ! गुणवंत कर्मचाऱ्यासह दूध उत्पादकांचा सन्मान !!
schedule16 Mar 23 person by visibility 587 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची स्थापना १६ मार्च १९६३ रोजी झालघ. ७०० लिटर दूध संकलनावर झाली आज ७०० लिटर वरुन सध्या प्रतिदिनी जवळपास १४ लाख लिटर दूध संकलन होत आहे. यासाठी दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्था, व कर्मचारी यांचे सहकार्य मोलाचे असून त्यांच्या सहकार्यामुळेच गोकुळ २० लाख लिटरचे उध्दिष्ठ साध्य करेल असा विश्वास संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. गोकुळच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथील कार्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संचालक अजित नरके यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा झाली. याप्रसंगी २०२२ -२३ वर्षातील गोकुळश्री स्पर्धेतील विजेते स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. संघाच्या कर्मचा-यांना ‘गुणवंत’ कामगार पुरस्कार देवून सन्मानित केले. संघाच्या मार्केटिंग विभागामार्फत पुणे व कोल्हापूर येथील जास्तीत-जास्त दूध विक्री करणा-या दूध वितरकांचाही सत्कार केले.गोकुळ दूध संघानही स्वतःचे अधिकृत ‘गोकुळ मिल्क ऑफिशयल’ या नावाने यूटयूब चॅनेल सुरु केले आहे. संघामध्ये उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या खालील तीन कर्मचा-यांना “गुणवंत कामगार” पुरस्काराने सन्मानित केले. या पुरस्कारामध्ये रोख १०,००० रुपये, स्मृति चिन्ह, व प्रशस्ती पञ देवून सपत्नीक सत्कार करणेत आला.
‘गुणवंत’ कामगार पुरस्कार तानाजी लक्ष्मण नलगे
क्लार्क /टेस्टर कोल्हापूर सॅटेलाईट डेअरी उदगांव, अरविंद गणपती पाटील वरिष्ठ गुणनियंत्रण अधिकारी
शिरोली दु.ता.करवीर, संजय बाबुराव पाटील सिनि.लॅब अटेडंट देसाईवाडी ता.भुदरगड यांना सन्मानित केले.
कोल्हापूर विभागातील दूध वितरकांचा सत्कार करण्यात आला. यामध्येमे.यशवंत ता.सह.खरेदी विक्री संघ पन्हाळा, अर्चना अरूण कुलकर्णी, प्रविण शंकर गोळे यांचा समावेश आहे.
याप्रसंगी माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, सुजित मिणचेकर यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी संचालक अभिजीत तायशेटे, नविद मुश्रीफ, बाबासाहेब चौगले, अंबरिषसिंह घाटगे,अमरसिंह पाटील, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शौमिका महाडिक उपस्थित होते.