टेनिस स्पर्धेत वरद पोळचा मानांकित खेळाडूवर विजय
schedule21 May 24 person by visibility 504 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या वतीने आयोजित १९व्या रमेश देसाई मेमोरियल १६ वर्षाखालील राष्ट्रीय ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या वरद पोळ याने दुसऱ्या मानांकित उत्तरप्रदेशच्या ऋषी यादवचा 6-3, 6-3 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.
कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या रिद्धी शिंदेने शिबानी गुप्तेचा टायब्रेकमध्ये 5-7, 7-6(5), 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव केला. महाराष्ट्राच्या श्रेया पठारेने क्वालिफायर प्रार्थना खेडकरचा 6-0, 6-2 असा तर, महाराष्ट्राच्या स्वनिका रॉय हिने गुजरातच्या एंजल पटेलचा 6-0, 6-4 असा पराभव करून आगेकूच केली. मध्यप्रदेशच्या अविशी शर्माने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या मेहक कपूरचा 0-6, 6-0, 7-5 असा पराभव केला. महाराष्ट्राच्या ध्रुवी आद्यंथयाने उत्तरप्रदेशच्या वर्णिका दीक्षितचे आव्हान 6-1, 6-0 असे संपुष्टात आणले. क्वालिफायर महाराष्ट्राच्या श्रीमोइ कामत हिने गुजरातच्या परिश्री मेघानीचा 7-5, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.