+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!!
Screenshot_20240226_195247~2
schedule29 Sep 22 person by visibility 1185 categoryआरोग्य
एनजीओ 24 कॉम्पेशन, कोल्हापूर वुई केअरचा पुढाकार, दोन-तीन ऑक्टोंबरला जैन बोडिऺंगमध्ये प्रदर्शन
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्राच्या मातीत फुलणाऱ्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या आणि आरोग्यकारी रानभाज्यांचे अनोखे प्रदर्शन दोन व तीन ऑक्टोंबरला कोल्हापूर येथे होत आहे. दिगंबर जैन बोडिऺंग येथे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले असेल अशी माहिती पर्यावरण तज्ञ प्राचार्य मधुकर बाचूळकर, मिलिंद धोंड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  या प्रदर्शनात शंभरहून अधिक रानभाज्या मांडण्यात येणार आहेत तसेच रानभाज्यांची बियाणे व तरु वापरून जवळपास 75 रोपे तयार केले आहेत. ही रोपे सुद्धा प्रदर्शनाची वेगळी वैशिष्ट्ये आहेत.  लोकांना रानभाज्यांची ओळख व्हावी म्हणून या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे मोहन माने यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन होत आहे. या प्रदर्शनात मुरुडा, सकाळू, तीन तोंडी करशिंगी, पपनस, सफेद मुसळी अशा दुर्मिळ रानभाज्या असणार आहेत. काटवलं, दिंडा, कुडा अंबुशी, पाथरी, शेवगा, कुरडु, आंबट चुका, चाकवत, केना, पानांचा ओवा, कपाळफोडी, चिवळ, आघाडा, काटेमाट अंबाडी सुरण, टाकळा, मटारू भुई आवळा, भारंगी, कवठं या औषधी गुणांनी युक्त आरोग्यवर्धक असलेल्या अनेक रानभाज्या प्रदर्शनात पाहता येतील. मोठ्या संख्येने रानभाज्यांचे प्रदर्शन पहिल्यांदाच होत आहे. गाणे या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला प्रदर्शनाचे प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्कळकी, अनिल चौगुले, डॉ. अशोक वाली, जयेश ओसवाल, भाग्यश्री कलघटगी, बा.बा. महाडिक, अमोल बुढे, सुशील रायगांधी उपस्थित होते..