Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत असमान निधी वाटप, काँग्रेसच्या सदस्यांचे शुक्रवारी लाक्षणिक उपोषण ! विकासकामे रखडली, सदस्यांचे आरोग्य बिघडण्याची वेळ ! !गग डडकेआयटीला आयएसटीईचे दोन मानाचे पुरस्कार कोल्हापुरात सुसज्ज आर्ट गॅलरीची गरज -  मालोजीराजे छत्रपतीविनापरवाना व्यवसाय करणाऱ्या जीमवर कारवाई, लॉजिंग व्यवस्थापनला नोटीस...तर गप्प बसणार नाही, कोल्हापुरात काँग्रेसच्या नगरसेवकांचा महायुतीला इशारातेरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत राजर्षी शाहू स्पोर्ट्स, ताराराणी विद्यापीठ स्पोर्ट्स विजयी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनीला नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधीरेडिओलॉजिस्ट डॉ. सुनील कुबेर यांचे निधनशिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यपदी प्राचार्य संजय सावंत

जाहिरात

 

जिल्हा परिषदेत असमान निधी वाटप, काँग्रेसच्या सदस्यांचे शुक्रवारी लाक्षणिक उपोषण ! विकासकामे रखडली, सदस्यांचे आरोग्य बिघडण्याची वेळ ! !

schedule16 Nov 26 person by visibility 16 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: जिल्हा नियोजन समितीमधून विकासकामांसाठी जिल्हा परिषद सदस्यांना मिळणाऱ्या २५२ कोटी रुपयांचा निधी हा जिल्हा परिषद सदस्यांनाच मिळावा. तसेच जिल्हा परिषदेचा स्वनिधी व अन्य निधीचे समान वाटप करावे. असमान निधी वाटपामुळे विकासकामांवर परिणाम होत आहे. निधी मिळण्यास होणारा विलंब, असमान निधी वाटप यामुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे आरोग्य बिघडण्याची वेळ आली आहे. अशा भावना काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमोर व्यक्त केल्या. तसेच त्यांना निधी संदर्भात मागण्यांचे निवेदन दिले. रेसिडेन्सी क्लब येथे त्यांनी पालकमंत्री आबिटकर यांची भेट घेतली.

काँग्रेसचे गटनेते व सदस्य एकनाथ पाटील, संभाजी पाटणकर, सुदर्शन खोत, सागर धुंदरे, महेश कुंभार, रणधीर मोरे, संदीप कांबळे, हामू पाटील, राहुल सावंत, अमर चौगले यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री आबिटकर यांची भेट घेतली. ‘जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन नऊ महिन्याचा कालावधी उलटला, अद्याप विकासकामांसाठी एक रुपयांचाही निधी मिळाला नाही. विकासकामे रखडली असल्यामुळे मतदारातून नाराजी उमटत आहे. आरोग्य, बांधकाम, ग्रामपंचायत, समाजकल्याण, पाणी पुरवठा, पशुसंवर्धन, महिला व बालविकास विभाग, कृषी विभागाडकील निधीचे वाटप होणार आहे. तसेच जिल्हा परिषद मतदारसंघातील  जास्त लांबीचे रस्ते करण्यासाठी निधी वितरित व्हायचे आहे. हा सर्व निधी जिल्हा परिषद सदस्यांना समप्रमाणात मिळावा.५० कोटी स्वनिधीचे विकासकामासाठी समान वाटप करावे अशी मागणी त्यांनी केली. या निधीचे समान वाटप झाले नाही तर २० नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषदेच्या आवारात लाक्षणिक उपोषण करतील असा इशाराही त्यांनी दिला.काँग्रेसच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जॅसमिन यांनाही निधी मिळण्यासंबंधी निवेदन दिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes