...तर गप्प बसणार नाही, कोल्हापुरात काँग्रेसच्या नगरसेवकांचा महायुतीला इशारा
schedule13 Nov 26 person by visibility 19 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ‘माजी राज्यपाल डॉ.डी. वाय. पाटील यांच्याविषयी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे, त्याचा आम्ही निषेध करतो.’ असे काँग्रेसच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.’ तसेच ‘मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरसाठी रचनात्मक कार्य काय केले ते एकदा जाहीर करावे. सत्तेच्या बळावर दडपशाहीचा प्रकार कराल तर तो खपवून घेणार नाही. तसेच महायुतीच्या नेतेमंडळींनी पुन्हा काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला आम्ही कार्यकर्ते गप्प बसणार नाही.’असा इशारा महापालिकेतील विरोधी पक्षनेते नगरसेवक राजेश लाटकर यांनी दिला.
गोकुळ अध्यक्ष निवडीवरुन महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. महाविकास आघाडीतर्फे काढलेल्या संघर्ष मोर्चामध्ये काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री चंद्रकांत पाटील यांचा खरपूस समाचार घेतला होता. तर गोकुळ अध्यक्ष निवडीनंतर महायुतीचे नेतेमंडळी व मंत्री मुश्रीफ व मंत्री पाटील यांनी काँग्रेसचे नेते व आमदार पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.
महायुतीच्या नेतेमंडळींच्या टीकेला उत्तर देताना काँग्रेसचे नगरसेवक लाटकर म्हणाले, ‘मंत्री पाटील यांनी माजी राज्यपाल डॉ.डी. वाय. पाटील यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आहे. डॉ. डी.वाय. पाटील यांना नाव ठेवण्याचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. डीवाय पाटील ग्रुपचे शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य आहे. त्यांनी विविध संस्था उभारल्या. अनेकांना रोजगार दिला. याउलट उच्च व तंत्रशिक्षणमंत्री पाटील यांनी किती जणांना नोकऱ्या दिल्या ? किती संस्था उभ्या केल्या ? अनेक वर्षे मंत्रीपदावर आहेत, कोल्हापूरसाठी भरीव कार्य काय केले ? गोकुळच्या निवडणुकीतही महायुतीने चुकीच्या पद्धतीने चेअरमनशीप लादला. आता दडपशाही खपवून घेणार नाही.’
काँग्रेसचे शहराध्यक्ष व नगरसेवक प्रवीण केसरकर म्हणाले, ‘मंत्री चंद्रकांत पाटलांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्याविषयी जे आक्षेपार्ह विधान केले त्याचा निषेध करतो. जे वक्त्व्य केले त्याचा निषेध. उच्च शिक्षण खाते सांभाळााऱ्या चंद्रकांत पाटील यांना अशा प्रकारची विधाने शोभणारे नाहीत.’