विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या जीमवर कारवाई, लॉजिंग व्यवस्थापनला नोटीस
schedule13 Nov 26 person by visibility 11 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शहरातील विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांविरोधात कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या परवाना, घरफाळा, विभागीय कार्यालय क्रमांक एक (गांधी मैदान) आणि उपद्रव शोध पथकाच्या संयुक्त पथकाने जरगनगर येथील योगेश्वरी कॉलनी जगतापनगर परिसरात कारवाई करून विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या जॅग्वार जिमवर कारवाई करुन सील करण्यात आले. तसेच या पसिरातील ओयो लॉजिंग या विनापरवाना व्यवसायधारकांस सहा दिवसांची नोटीस दिली. ही कारवाई परवाना अधीक्षक दत्तप्रसाद माजगावंकर, उपद्रव शोध पथकाचे जवान विलास पाटील, संतोष रानमाळे, शिवाजी कुंभार, परवाना निरिक्षक शिवाजी कोकरे, उदय भोसले, घरफाळा लिपीक संतोष आवळे, सागर गायकवाड, प्रविण भोसले, चंदू पाटील तसेच घरफाळा, परवाना आणि विभागीय कार्यालय क्रमांक एकमधील कर्मचाऱ्यांनी केली.