अनुदानतंर्गत दूध उत्पादकांना मिळणार अकरा कोटी ! योजनेसाठी काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा गोकुळमध्ये सत्कार !!
schedule30 Mar 24 person by visibility 437 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संगणक विभागाचे व्यवस्थापक अरविंद नारायण जोशी यांनी सरकारच्या प्रतिलिटर ५ रुपये गाय दूध अनुदान योजनेचे काम अतिशय चागंल्या पद्धतीने कमी वेळेत पूर्ण केलेबद्दल गोकुळच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. चेअरमन डोंगळे यांच्या हस्ते हा सत्कार झाला.
चेअरमन डोंगळे म्हणाले, गोकुळ सलंग्न दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर लवकरच ११ कोटी ३२ लाख ४९ हजार ८३५ इतके अनुदान जमा होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुदान मिळवणारा गोकुळ हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा संघ आहे. दूध उत्पादकांना हे अनुदान मिळवून देण्यासाठी संगणक, संकलन व पशुसंवर्धन या विभागांनी झोकून देऊन काम केले, याच पद्धतीने संघातील सर्वच कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी काम करावे आणि प्रत्येकाचा सत्कार असा संचालक मंडळामध्ये व्हावा.
राज्यातील गाईचे दूध दर कोसळल्यानंतर गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने गाय दूध खरेदीसाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान योजना जाहीर केली. गोकुळने या दूध अनुदान योजनेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करून जवळपास रुपये ११ कोटी ३२ लाख इतके अनुदान दूध उत्पादकांना मिळेल अशी माहिती सरकारकडे अपलोड केली आहे.
यासाठी संघाच्या संगणक विभागाचे व्यवस्थापक अरविंद जोशी आणि त्यांच्या टीमने गोकुळचे एक स्वतंत्र मोबाईल ॲप बनवून त्यामध्ये डाटा अपलोड करण्याची सुविधा दूध संस्थांना उपलब्ध करून दिली. त्यामुळे जास्तीत जास्त दूध उत्पादकांचा डाटा विहित वेळेत संघाकडे एकत्रित करणे व तपासून सरकरकडे पाठवणे शक्य झाले त्यामुळे संघाला सदरचे अनुदान प्राप्त करणे शक्य झाले.
याप्रसंगी जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले उपस्थित होते.