प्रा.. शशिकला सरगर यांना महाराणी ताराराणी पुरस्कार प्रदान
schedule15 Mar 26 person by visibility 20 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ओंकार वेलफेअर फाऊंडेशन कोल्हापूरच्यावतीने करवीर गादीच्या संस्थापिका छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती व महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात कर्तबगार महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. समाजप्रबोधन, परिवर्तन आणि महिलांच्या उन्नतीसाठी कार्यरत महिलांना पुरस्कार दिला जातो. या समारंभात प्रा. शशिकला तुकाराम सरगर यांना महाराणी ताराराणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. यशोधरा उबेरॉय यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. सन्मानपत्र, महाराणी ताराराणी यांची प्रतिमा असे पुरस्काराचे स्वरुप आहे. शाहीर दिप्ती जाधव यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयमाला शिवराज पाटील होत्या. कल्पना अमोल सरनाईक यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी सरिता सासने, सारिका करण शिंदे, वैशाली कदम, साक्षी पाटील, माया सुर्वे, भारती साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. दिप्ती अनिकेत जाधव यांनी सूत्रसंचालन केले. नेहा माने यांनी आभार मानले. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंदिर येथे हा कार्यक्रम झाला.