Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भैया मानेंना काँग्रेसचाच पर्याय,  महायुतीच्या भांडणात उमेदवारीच्या लॉटरीची शक्यता कमी - सतेज पाटीलप्रा.. शशिकला सरगर यांना महाराणी ताराराणी पुरस्कार प्रदानताराराणी महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन, सासने मैदान येथे महोत्सव गोकुळकडून आईस्क्रीम निर्मिती, विविध फ्लेवरमध्ये उपलब्ध ! रविवारी शुभारंभ!!कोल्हापूर फर्स्ट पोहोचले दिल्लीत ! केंद्रीय मंत्र्यांच्यासोबत रेल्वे- रस्ते- पर्यटनासंबंधी चर्चा !!सुर्यकांत पाटलांचा बाजार समिती सभापतिपदाचा राजीनामा, राजकीय संन्यासाची घोषणा शिवाजीराव कदमांचे स्मारक विधायक कार्यासाठी प्रेरणादायी ! गणेश पतसंस्थेच्या प्रांगणात पुतळयाचे अनावरण !!कृष्णराज महाडिक दिल्लीत, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची घेतली भेट करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शन व्यवस्थेत बदल ईद फेस्टिव्हलचे मंगळवारी उद्घाटन

जाहिरात

 

भैया मानेंना काँग्रेसचाच पर्याय,  महायुतीच्या भांडणात उमेदवारीच्या लॉटरीची शक्यता कमी - सतेज पाटील

schedule15 Mar 26 person by visibility 420 categoryराजकीय

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " महायुतीच्या भांडणामध्ये भैय्या मानेना  उमेदवारीची लॉटरी लागण्याची शक्यता नाही. तेव्हा त्यांच्यासाठी आम्हीच (काँग्रेस) हाच पर्याय असणार आहे " अशी राजकीय टिप्पणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी केले.
  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी राजकीय टोलेबाजी केली. रविवारी 15 जानेवारी 2026 रोजी गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध प्रकल्प येथे कार्यक्रम झाला. याप्रसंगी गोकुळ तर्फे उत्पादित केलेल्या आईस्क्रीम चा शुभारंभ झाला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके,  माजी आमदार के पी पाटील, राजेश पाटील,  गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात दूध उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना आमदार सतेज पाटील यांनी व्यासपीठावर उपस्थित नेते मंडळी व संचालकांची नावे घेतली. व्यासपीठाकडे बघत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने दिसत नाहीत? कोठे गेले ? असा उल्लेख केला. दरम्यान भैया माने हे तोपर्यंत व्यासपीठावरून बाहेर पडले होते.
व्यासपीठावरील नेते मंडळीकडे पाहत सतेज पाटील पुढे म्हणाले, महायुतीच्या भांडणामध्ये भैय्या माने यांना उमेदवारीची लॉटरी लागेल असे वाटत नाही. तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी पर्याय असणार आहोत असे विधान केले त्यांच्या या विधानावर उपस्थितात चांगलाच हशा पिकला. भैया माने हे पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीची लढाई करता तयारी करत आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघातून आमदार करणार अशी घोषणा यापूर्वी केली आहे. दरम्यान पुणे पदवीधर मतदार संघातून भारतीय जनता पक्षही निवडणुकीची तयारी करत आहे. क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याकडेही महायुतीचे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. दुसरीकडे मंत्री मुश्रीफ यांनी भैय्या माने यांना निवडून आणू अशी घोषणा कागलमध्ये यापूर्वी एका कार्यक्रमात केले आहे. महायुतीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळणार? हे अजून स्पष्ट नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर गोकुळ येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांनी राजकीय विधान केल्यामुळे चर्चेचा विषय ठरला. दरम्यान आमदार  पाटील यांच्या या विधानावर मंत्री मुश्रीफ  यांनी गोकुळ मधील कार्यक्रमादरम्यान  कोणतेही भाष्य केले नाही.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes