शिवसेनेतर्फे इच्छुक उमेदवारासह पदाधिकाऱ्यांचा शुक्रवारी मेळावा : आमदार राजेश क्षीरसागर
schedule18 Dec 25 person by visibility 51 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांचा आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मिशन महानगरपालिका" मेळावा शुक्रवारी १९ डिसेंबर २०२५ रोजी होत आहे. जुना बुधवार पेठ, ब्रह्मपुरी परिसरातील अभिषेक लॉन येथे सकाळी अकरा वाजता मेळावा होणार आहे. अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुती एकत्र लढणार आहे. या निवडणुकीत महायुतीचा भगवा महापालिकेवर फडकविण्यासाठी महायुतीमधील सर्वच पक्षांचे एकमत झाले आहे. शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षही निवडणुकीत संपूर्ण ताकतीने उतरत आहे. शिवसेनेकडे शहरातील विविध प्रभागात इच्छुक आणि सक्षम उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने नियोजन आणि जनसंपर्क वाढवून मतदारांपर्यंत शिवसेनेची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे असे क्षीरसागर यांनी म्हटले आहे.