Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवाजीराव कदमांचे स्मारक विधायक कार्यासाठी प्रेरणादायी ! गणेश पतसंस्थेच्या प्रांगणात पुतळयाचे अनावरण !!कृष्णराज महाडिक दिल्लीत, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची घेतली भेट करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शन व्यवस्थेत बदल ईद फेस्टिव्हलचे मंगळवारी उद्घाटनमहापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ  नाही - सत्ताधारी नगरसेवकांची व्यावसायिकांना ग्वाहीवरिष्ठ शिक्षकांना टीईटीमधून सूट द्यावी, खासदार धनंजय महाडिकांची संसदेत मागणीकुलगुरुपदासाठीच्या अर्जांचे शॉर्टलिस्ट, २५ जणांची यादी तयार ! एप्रिलमध्ये मुलाखती ! !जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनएलआयसीचे निवृत्त अधिकारी नंदकुमार जाधव यांचे निधन हरिप्रिया एक्स्प्रेसमधील कमी केलेल्या प्रवासी डब्यांची संख्या पूर्ववत करा-

जाहिरात

 

शिवसेनेतर्फे शुक्रवारी इच्छुक उमेदवारांची प्रशिक्षण कार्यशाळा

schedule11 Dec 25 person by visibility 418 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभरात शहर आणि गावपातळीवर धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष सुरु करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण कार्यशाळा आणि शिबिर होणार आहेत. यामध्ये आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुका लढविण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी किंबहुना निवडणूक पूर्वीची रणनिती आखण्यासाठी इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. "मिशन कोल्हापूर महानगरपालिका" अंतर्गत शिवसेना इच्छुक उमेदवारांची  कार्यशाळा शुक्रवारी (१२ डिसेंबर २०२५ ) होत आहे. अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी  दिली आहे. दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे सकाळी अकरा वाजता कार्यशाळेला प्रारंभ होईल. निवडणुकीपूर्वी प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्या मार्गी लावणे, मतदारापर्यंत पक्षाचे काम, सरकारी योजना पोहचवून जनसंपर्कातून वातावरण निर्मिती करण्यासाठी ही कार्यशाळा महत्वाची ठरणार आहे. याप्रसंगी शिवसेना पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसह त्यांच्या प्रतिनिधीना निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, कायदे तज्ञांचे सल्ले, खर्च हिशोबाचे प्रशिक्षण आदी देण्यात येणार आहे. या कार्यशाळेस शिवसेना पक्षाचे निवडणूक राज्य समन्वयक वैभव वाघ आणि मयूर कदम प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कार्यशाळेस शिवसेनेच्या सर्व इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes