कोल्हापुरात ट्रक महोत्सव उत्साहात ! चेतन मोटर्स - टाटा मोटर्सचा पुढाकार !!
schedule18 Jul 24 person by visibility 366 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हटके छंदासाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे. अत्याधुनिक मेोटारी असोत की दुचाकीतील नवीन मॉडेल्स...कोल्हापूरकरांनी नेहमीच त्याला प्राधान्य दिले आहे. गुरुवारच्या सायंकाळी कोल्हापुरात ट्रक महोत्सव आयोजित केले होते. चेतन मोटर्स आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने भरविलेला हा ट्रक महोत्सव ही आकर्षण ठरला. हॉटेल पर्ल येथे हा कार्यक्रम झाला. ट्रक व्यावसायिक मोठया संख्येने सहभागी झाले.
या ट्रक महोत्सवाच्या माध्यमातून चेतन मोटर्स आणि टाटा मोटर्स यांचे ग्राहकांसोबत असणारे व्यावसायिक संबंध वृद्धिंगत व्हावेत तसेच टाटा आयएलएमसीव्ही श्रेणीच्या ट्रकच्या संदर्भातील माहिती देण्याच्या हेतूने महोत्सवाचे आयोजन केले होते. या श्रेणीमध्ये दोन टन ते तेरा टन पासिंगसह 1+2 सुविधा प्राप्त असलेल्या वाहनाचा समावेश होतो.या रेंज मधील आयएलएमसीव्ही वाहणाची मागील वर्षभरात जादा विक्री, मायलेज बादशहा, किंग ऑफ रोड असे अनेक अवॉर्ड मिळाले आहेत. मॉडेल ऑफ द इयर म्हणून एलपीटी १९९६ ला सन्मानीत केले आहे.
“ चेतन मोटर्सच्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील सर्व शोरूम्समध्ये आयएलएमसीव्ही श्रेणीतील वाहनांसह इतर सर्व मॉडेल्स उपलब्ध आहेत. यामध्ये एस (छोटा हत्ती), एस सीएनजी, एस इलेक्ट्रिक, टाटा योध्दा, कन्स्ट्रक्शन व्यवसायासाठी लागणारी वाहनं, प्रवासी वाहतुकीसाठी टाटा विंगर, टाटा मॅजिक, विद्यार्थ्यांसाठी स्कुल बसेस, वगैरे उपलब्ध आहेत” अशी माहिती चेतन मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी दिली.
.....................
चेतन मोटर्सकडून ३५ हजारांहून अधिक वाहनांची विक्री
वीस वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये चेतन मोटर्सच्या माध्यमातून टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीला सुरुवात झाली. टाटा मोटर्सने २००५ मध्ये आणलेल्या टाटा एस म्हणजेच छोटा हत्तीच्या स्वरूपात चेतन मोटर्स खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोहोचला. उंचगाव मध्ये असणाऱ्या पहिल्या शाखेनंतर जिल्ह्यातील ग्राहकांना अधिक सुलभ सेवा देता यावी, म्हणून गडहिंग्लज, इचलकरंजी येथे स्वतःची आधुनिक वर्कशॉप्स सुरू केली. हायवेवरून जाणाऱ्या मोठ्या वाहनधारकांसाठी गोकुळ शिरगाव येथे कंटेनर वर्कशॉप सुरू केले. चेतन मोटर्सला २०१७ मध्ये सांगली जिल्ह्यात वाहन विक्री, विक्री पश्चात सेवा पुरवण्यासाठी टाटा मोटर्सने संधी दिली. चेतन मोटर्सने संधीचे सोनं केले. अल्पावधीतच जत, डिग्रज, कामेरी (वाघवाडी फाटा) येथेही विक्री, विक्री पश्चात सेवा सुरू केली. ग्राहक सेवा हाच चेतन मोटर्स भक्कम पाया असून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात चेतन मोटर्सकडून आज पर्यंत ३५ हजारांहून अधिक वाहनांची विक्री करण्यात आली असून बपाच लाखहून अधिक वाहनांना सर्व्हिस दिली आहे.